शिक्षक प्रदीप सिंग पाटील यांचा पर्यावरण गौरव पुरस्काराने सन्मान
पुणे :- भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट फिरोदिया सभागृह पुणे येथे एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडिया' आणि 'महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा'च्या वतीने पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पर्यावरण जीवनगौरव, पर्यावरण भूषण आणि पर्यावरण गौरव पुरस्कार सत्कार सोहळा संपन्न झाला.यावेळी स्वामी विवेकानंद विद्यालय पंचवटी येथील उपशिक्षक प्रदीप सिंग पाटील, यांना त्यांच्या सामाजिक शैक्षणिक व पर्यावरणातील योगदानाबद्दल पर्यावरण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ जी डी यादव तसेच एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष अमोल घमंडे, सचिव गणेश शिरोडे, खजिनदार सचिन पाटील, यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, यांच्या हस्ते पाटील यांना मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
Comments
Post a Comment