अंबड पोलीसांची एकास अटक दोन गुन्हे उघड, सुमारे २ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

अंबड पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी  चैन स्नॅचिंग करणारा आरोपी जेरबंद; दोन गुन्हे उघड, सुमारे २ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
नाशिक :- अंबड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने चैन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेत त्याच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत सुमारे २,०९,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक शहर, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २)  किशोर काळे तसेच सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, यांच्या सूचनांनुसार व मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणातील आरोपीताचे नाव आदित्य एकनाथसोनवणे, (वय २५ वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा.आजिंक्यतारा हॉटेल मागे, सरदवाडी रोड, झापवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) असे आहे. त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आहे. दिनांक १९ जून २०२५ रोजी सायंकाळी ९.३० वाजता फिर्यादी मिनाक्षी पंकज पिंगळे (वय ४० वर्षे, व्यवसाय गृहिणी, रा. निलांजन अपार्टमेंट, माऊली लॉन्स, डी.जी.पी. नगर, नाशिक) या त्यांच्या सासुबाई व मुलीसोबत वॉकिंग करत असताना गणेश स्वीट्सजवळील रस्त्यावर दोन इसम मोटरसायकलवर येऊन थांबले. मागे बसलेल्या इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढून जबरदस्तीने चोरून नेले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४०९/२०२५, भारतीय दंड संहितेच्या कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणातील तपास करत असताना पोलीस अमलदार तुषार मते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संभाजी स्टेडियम परिसरात एक इसम यामाहा कंपनीची मोटरसायकल (क्र. एम.एच-१५ जी.यू.-१५२२) घेऊन येणार असून त्याने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चैन स्नॅचिंग केली आहे. सदर माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकातील सपोनि विलास पडोळकर, पोलीस हवालदार योगेश देसले, पोलीस शिपाई तुषार मते, अनिल गाढवे, राकेश पाटील, सचिन करंजे, मयुर पवार व संजय सपकाळे यांनी सापळा रचून आरोपी आदित्य सोनवणे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी विश्वासात घेऊन तसेच बुध्दी कौशल्य वापरून तपास केला असता, त्याने दोन ठिकाणी चैन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली.या तपासादरम्यान खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला: यामाहा कंपनीची मोटरसायकल (क्र. एम.एच-१५-जी.यू.-१५२२) सोन्याच्या साखळ्या: एकाची किंमत ९०,०००/- रुपये व दुसरीची किंमत ४४,०००/- रुपये मिळून अंदाजे २,०९,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, अंबड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुन्हे शोध पथकाच्या या कार्यवाहीने नाशिक शहरातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक बळकट झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला