आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा विठू नामाचा गजर

नाशिक :- गर्जना फाउंडेशन व गोविंदनगर हास्य योगा क्लब यांचे वतीने परिसरात आषाढी एकादशी निमित्त भर पावसात पारंपरिक वेषभूषा करून पालखी दिंडीत ज्येष्ठ नागरिकांसह बालगोपाळ विठ्ठल रुक्मिणीचा वेश परिधान करून विठू नामाचा गजर करत सहभागी झाले होते. दिंडीत पालखी व वारकरी संप्रदायाच्या वेशभूषा करून खांद्यावर पताका डोक्यावर तुळस विठुरायाची मूर्ती घेऊन सकाळी सातला पालखीचे पूजन गर्जना फाउंडेशनचे सागर मोटकरी,तसेच गोविंद नगर हास्य क्लबच्या छाया नवले,यांच्या हस्ते करून पालखी यात्रेस प्रारंभ झाला.गोविंदनगर परिसरातील नागरिकांनी काशीको नगर, सुंदरबन कॉलनी, सदगुरू नगर, वझरे नगर,गणपती मंदिर,चौक नंबर चार मार्गाने जिजाऊ हॉल येथे दिंडी आली यावेळी मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या हस्ते महाआरती पुजा करण्यात आली पालखी दिंडीत गोविंद नगर परिसरातील बाल गोपाळांसह आबालरुद्धांनी डोक्यावर विठ्ठल रुक्माईची मूर्ती तसेच तुळशी वृंदावन घेऊन पायी परिसरात परिक्रमावारी केली.नागरिकांनी टाळ वाजवत विठू रायाचा गजर केला.बालगोपाळांनी विठ्ठल रुक्माईची वेशभूषा परिधान करत दिंडीत आपली हजेरी लावली.आपण आयुष्यात नेहमी हसत राहिले पाहिजे आणि हसल्या मुळे आपल्या शरीरातील अनेक रोग दूर होत असतात,असे मनोगत यावेळी पोलीस निरीक्षक नरुटे यांनी व्यक्त केले.मान्यवरांचा तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.आयोजकांनी यावेळी खिचडी तसेच केळी प्रसाद करण्यात आले.दिंडी सोहळ्याच्या आयोजना साठी गर्जना फाउंडेशनचे सागर मोटकरी,तसेच गोविंद नगर हास्य क्लबच्या छाया नवले,संजय बाविस्कर, राकेश पाथरे, राहुल पानसे, साहिल मोटकरी,आदींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन