विद्यार्थ्यांना मोफत शालेय शिक्षण साहित्य वाटप ना रोडला कार्यक्रम संपन्न
ना.रोड :- "विद्यार्थी सशक्तीकरण सोहळा" विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने,असंख्य नागरीक, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ॐ साई लॉन्स, सिन्नर फाटा, नाशिक रोड येथे पार पाडला या सोहळ्यास मार्गदर्शन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस,अमोल भागवत,यांनी केले,आयोजन मानवाधिकार संघटनेचे नाशिक शहर अध्यक्ष अविनाश वाघ, दिपक वाघ, नगरसेवक हरिश भडांगे,यांनी केले.आर्टिलरी चे कर्नल मच्छिंद्र सिरसाट,जयरामभाई हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. सुनील जाधव, मनपा नगरसेवक हरिशभाऊ भडांगे, मनपा नगरसेविका जयश्रीताई खर्जुल, मनसे महिला शहराध्यक्ष अक्षरा घोडके, भाजपा नेते, मा. नगरसेवक मधुसूदन गायकवाड, शिवसेनेच्या रोहिणी वाघ, हभप, साक्षी पळसकर, शिवसेना नेते योगेश भोर, विशाल कलेक्शन संचालक मयूर गणोरे, निर्भीड ज्योत संचालिका आशा कर्डक मोरे,शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष मंगेश करंजकर, शिवसेनेचे नितीन खर्जुल, अस्मिता देशमाने, भाजपच्या सुषमा गोराणे, स्वराज्य पक्ष महिला उपाध्यक्ष रेखा जाधव, मनसे उपतालुकाध्यक्ष कैलास भोर, दिपक वाघ, रवी वाघमारे, अनिल मोरे, यांची प्रमुख उपस्थितीत लाभली.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी नुतन विद्यामंदिर येथील शिक्षक ललित भदे,यांनी सूत्रसंचालन केले. रोहिणी वाघ, ज्योती परदेशी, कीर्ती उदावंत, सविता आहेर, रमेश चेवले, दिलीप गायकवाड, संजय बलकवडे, सुभाष ठुबे, श्याम डावरे, दिनेश झुटे, तुकाराम हांडगे,अजय चव्हाण, पंडित मोरे, बिस्मिल्ला खान,अमित लोखंडे, किरण पगारे, स्वप्निल वाघ, अरुण पगारे, सागर सोनकांबळे, सुरेश सातव, राहुल जमदाडे, साहिल अन्सारी, विनायक सोनवणे, सागर वाघ, मनोज वाघ, दहावीत सुतार समाधान पगारे, दिपाली वाघ, लताबाई गायकवाड, विशाल जाधव,यांनी विषेश परिश्रम घेतले. कार्यक्रमांमध्ये प्रमुख वक्ते अमोल भागवत,यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.अनेक महान व्यक्तींनी आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीचे काम केले. त्यांच्या क्षेत्रामध्ये कसे यश संपादन केले याविषयी सविस्तर माहिती दिली. मानवाधिकार संघटनेचे नाशिक शहराध्यक्ष अविनाश वाघ, यांच्या कुटुंबीयांनी दोन विद्यार्थ्यांना रोख रक्कम दिली.कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. गरीब परिस्थिती असलेल्या निराधार विद्यार्थ्यांसाठी आयोजकांनी विद्यालयाकडून यादी घेतली आहे लवकरच त्यांनाही शालेय साहित्य वाटप करण्यात येईल असे आश्वासन आयोजकांनी दिले.
Comments
Post a Comment