किशोर झोटिंग यांचा सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे सत्कार
नाशिक :- जिल्हा मुख्याध्यापक संघ व सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना गुरुजन सन्मान देऊन गौरवण्यात आला. याप्रसंगी स्वामी विवेकानंद विद्यालय पंचवटी नाशिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर झोटिंग यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात येऊन त्यांची नाशिक शहर मुख्याध्यापक संघाच्या सदस्य पदि देखील निवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी तसेच सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.संजय चावला ,डॉ.चेतन जोशी , डॉ.अशिष गायकवाड उपस्थित होते.
Comments
Post a Comment