नाशिक येथे एक दिवसीय ज्ञानदीप राष्ट्रीय कर परिषदेचे आयोजन
नाशिक सिडको - कर सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट,वकील व व्यावसायिकांसाठी एक दिवसीय राष्ट्रीय कर परिषद ज्ञानदीप २०२५ रविवार दि. १३ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५:३० या वेळेत हॉटेल फोर पॉईंट्स, गोविंद नगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेचे आयोजन नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोशिएशन, नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोशिएशन, MTPA, AIFTPA आणि GSTPM या राष्ट्रीय संस्था संयुक्तपणे करीत आहेत.परिषदेमध्ये कर क्षेत्रातील जीएसटी व आयकर क्षेत्रातील ताज्या बदल,नवीन सुधारणा,केस स्टडीज तसेच व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणार आहेत.या परिषदेचे अध्यक्ष म्हणून नाशिक टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांची निवड केली आहे. परिषदेमध्ये जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment