द्वारका सर्कलवरील अंडरपासबाबत मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आढावा


नाशिक,दि.२१:- (प्रतिनिधी समाधान शिरसाठ)नाशिक शहरातील द्वारका चौकात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या वतीने अंडरपासची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज द्वारका सर्कल येथे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करत याठिकाणी विकसित करण्यात येणाऱ्या अंडरपासची माहिती घेत याठिकाणी करावायच्या विविध उपाययोजनांबाबत सबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख,पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, नाशिक महानगरपालिका वाहतूक सेलचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागुल,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्र पगार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, आकाश पगार,पांडुरंग राऊत,अमर वझरे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. द्वारका सर्कल नाशिकहून नाशिकरोड कडे जाताना ८०० मीटरचा अंडरपास तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील हलकी वाहने ये जा करू शकणार आहे. या मुख्य अंडरपास मार्गाला धुळ्याकडे जाणारी वाहतूक देखील जोडली जाणार आहे. यासाठी वडाळानाका येथे ३०० मीटरचा दुसरा अंडरपास विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे चौकातील वाहतूक सुरळीत होणार आहे. हा अंडरपास विकसित करतांना सर्व बाबींचा काटेकोरपणे अभ्यास करण्यात यावा. त्यात कुठल्याही त्रुटी राहू नये. तसेच द्वारका सर्कल वरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून ट्राफिक पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात यावे अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केल्या.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन