शिव दुर्गप्रेमी प्रेमी सकल मराठा परीवार संस्थेचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान


नाशिक :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक जिल्ह्यातील साल्हेर दुर्गाला युनेस्कोचे 'मराठा मिलिटरी लँडस्केप'अंतर्गत जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन प्राप्त झाले आहे. या प्रक्रियेत छत्रपतींचा एक मावळा म्हणून सकल मराठा परीवार संस्थेने तसेच समन्वयक खंडू आहेर,यांनी दाखविलेली सजगता,आपल्या वारसास्थळाबद्दलची आपुलकी आणि हा वारसा जपण्याची तळमळ याशिवाय हे यश शक्य नव्हते.या अभिमानास्पद क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी, तसेच दुर्ग संवर्धनात सकल मराठा संस्थेने केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी नाशिक इतिहास संशोधन मंडळ यांनी एक विशेष परिसंवाद व सन्मान समारंभ आयोजित केला होता.आपला ऐतिहासिक वारसा संवर्धनातील सक्रिय सहभागामुळे, तसेच युनेस्कोच्या जागतिक वारसा मानांकन प्रक्रियेत दिलेल्या मोलाच्या सहकार्यामुळे एक ऐतिहासिक यश आपल्या सर्वांसमोर उभे आहे. किल्ल्यासह महाराष्ट्रातील एकूण 11 किल्ल्यांना आणि तामिळनाडूतील एका किल्ल्याला युनेस्कोने 'मराठा मिलिटरी लँडस्केप' अंतर्गत जागतिक वारसास्थळाचा दर्जा बहाल केला आहे. मराठा साम्राज्याचा वारसा जपण्यासाठी संस्थेने दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल नासिक इतिहास संशोधन मंडळ व राज्य पुरातत्त्व विभागातर्फे सकल मराठा परिवार संस्थेस सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. या कार्याला मिळालेला हा सन्मान संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. यावेळी अनेक दुर्गसंवर्धन संस्थांचादेखील सन्मान करण्यात आला. या सन्मान समारंभासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस अँड नितीन ठाकरे,  पुरातत्त्व विभागाचे अमोल गोटे, स्मिता कासार पाटील, नाशिक इतिहास संशोधन मंडळ अध्यक्ष योगेश कासार पाटील, सचिव चेतन राजापूरकर, तसेच मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्याप्रसंगी संस्थेचे समन्वयक खंडू आहेर, आनंद पाटील, योगेश वरखडे ,संजय गोरडे,मधुकर जाधव,चेतन लोखंडे,दिलीप पवार,स्नेहल चौधरी आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन