राष्ट्रवादीचे पदाधिकारी सचिन कुर्मी यांच्या हत्ये प्रकरणी आमदार पंकज भुजबळ आक्रमक
राष्ट्रवादीचे पदाधिकारी सचिन कुर्मी यांच्या हत्येप्रकरणी आमदार पंकज भुजबळ आक्रमक - विडीओ बघण्यासाठी क्लिक करावे
राष्ट्रवादीचे पदाधिकारी सचिन कुर्मी यांच्या हत्ये प्रकरणी होणार एसआयटी चौकशी आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रश्नावर गृहराज्य मंत्री योगेश कदम यांची माहिती
मुंबई,नाशिक,दि.१०जुलै:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सचिन कुर्मी यांच्या हत्येची एस आयटी चौकशी करण्यात येईल अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आमदार पंकज भुजबळ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील उत्तरात विधीमंडळाच्या सभागृहात दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सचिन कुर्मी यांच्या हत्येबाबत आमदार पंकज भुजबळ यांनी मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात आक्रमक भूमिका घेत प्रश्न उपस्थित केला. यावेळी आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, सचिन कुर्मी यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नी अनुपमा सचिन कुर्मी यांनी तक्रार दाखल केली. यामध्ये प्रमुख तीन आरोपींचा उल्लेख केला आहे. जे सराईत गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. यामध्ये विजय बुवा कुलकर्णी, अमर चोरगे, शुभम वागासकर यांची चौकशी आपण करणार का. त्यांना अटक करणार का.? असा सवाल उपस्थित केला.
संबंधित हत्येच्या संदर्भातील पुरावे हे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या संगनमताने नष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आपण संबंधित तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची चौकशी करणार काय....? हत्येच्या ठिकाणचे सीसीटीव्ही पुरावे कोणी नष्ट केले. त्याचबरोबर एफआयआर मध्ये नमूद प्रमुख संशयित असलेले हे तीनही आरोपी विजय कुलकर्णी, अमर चोरगे, शुभम वागासकर यांचे सीडीआर रेकॉर्ड का तपासले गेले नाहीत...? आरोपींना शस्त्र पुरवणाऱ्या लोकांवर कारवाई का केली गेली नाही..? असे ते म्हणाले.
तसेच सचिन कुर्मी हत्याप्रकरणी अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होणे बाकी आहे. अद्याप प्रमुख संशयित आरोपी हे मोकाट असून हे प्रमुख संशयित आरोपींपैकी काहीजण आजही मृत सचिन कुर्मी यांच्या परिवारास जीवे मारण्याच्या उद्देशाने धमकावत आहेत, त्याबद्दल नुकतीच एनसी देखील पोलिस स्टेशन मध्ये दाखल करण्यात आली असून संबंधित परिवारास आपण पोलीस संरक्षण देणार का...? विजय बुवा कुलकर्णी हा आजही बंदूक दाखवून सर्वांना धमकावत आहे. त्याच्याकडे ही बंदूक कुठून आली ज्याच्यावर हत्या केल्याचे अनेक आरोप आहेत. त्याच्या कडे अशी हत्यार असतील तर त्यावर आपण कडक कारवाई करणार का..? असा सवाल उपस्थित करत सचिन कुर्मी हत्याप्रकरणी एसआयटी स्थापना करून चौकशी करावी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. आणि प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. हा प्रकार आर्थिक वादातून घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. उर्वरित आरोपींची नावं समोर आली असली तरी ते अधिकृत आरोपी म्हणून अद्याप नोंदवले गेलेले नाहीत. या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येईल. सीडीआर रिपोर्ट आणि इतर तांत्रिक तपासही लावण्यात येईल. कोणालाही सोडणार नाही. तसेच यापूर्वी संबंधित लोकांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पुढील तपास एसआयटी मार्फत करून सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील आपला सहभाग नोंदवित प्रश्न उपस्थित केला.
Comments
Post a Comment