मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ‘महाडीबीटी’वर अर्ज प्रक्रिया सुरु

मुंबई, दि. १६ :- शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता महाडीबीटी प्रणालीवरून नवीन तसेच नुतनीकरण मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्जाची ऑनलाईन स्वीकृती १ जुलै २०२५ पासून सुरू झाली आहे. मुंबई उपनगर अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी नोंदणीकृत अर्ज तत्काळ ऑनलाईन मंजूर करावेत, असे आवाहन मुंबई उपनगरचे सहायक आयुक्त रवीकिरण पाटील यांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे, नोंदणीकृत झालेल्या अर्जांपैकी नूतनीकरण झालेल्या अर्जांचे प्रमाण नवीन अर्जांच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी प्रथम प्राधान्याने नूतनीकरण अर्जांची पडताळणी करून ते ऑनलाईन मंजूर करावेत व मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त यांच्या लॉगिनवर तत्काळ पाठवावेत.त्याचबरोबर भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती या प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला