ना.रोड रेल्वे पोलीसांनी चार लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत दोघांना अटक
ना.रोड :- (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त नाशिक रोड रेल्वे पोलिसांची प्रभावी कामगिरी. फिर्यादी नामे दीपक चंद्रकांत सोनवणे राहणार रामानंद नगर तालुका जिल्हा जळगाव हे गीतांजली एक्सप्रेसचे गीतांजलि एक्सप्रेस मधून कल्याण ते जळगाव असा प्रवास करत असताना नाशिक रोड रेल्वे स्टेशन येण्याच्या दहा मिनिटे अगोदर त्यांना समजले की त्यांचे एक सॅकबॅक त्यात एक आयफोन आय पॅड व रोख रक्कम असे चोरट्याने चोरून नेले बाबत नाशिक रोड येथे तक्रार दाखल होती. त्यावरून चोरीस गेलेल्या आयफोनचे आयफोन हा ट्रेसिंग प्राप्त झाल्याने सदर आयफोन विकत घेणारा कृष्णा धोंडू लोहकरे याला ताब्यात घेतले असता त्याने सदरचा मोबाईल हा चोरीचा असल्याचे माहित असून देखील विकत घेतले चे कबूल केल्याने व त्याने सदरचा मोबाईल हा रुपेश अजय जाधव राहणार दोघे कसारा तालुका शहापूर जिल्हा ठाणे यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले त्यावरून दोन्ही आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्यातील एक आयपॅड व गुन्ह्याव्यतिरिक्त एक एचपी कंपनीचा लॅपटॉप व तीन मोबाईल असा एकूण 4,30,000/ रु चा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करण्यात आलेला आहे.सदरची कामगिरी ही स्वाती भोर, पोलीस अधिक्षक, रेल्वे छत्रपती संभाजीनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय लोहकरे, यांचे मार्गदर्षनाखाली रे.पो.स्टे. नाशिकरोड येथील प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन बनकर, पो उप निरी अश्विनी टिळे, पो उपनि संजय केदारे, सहाय्यक फौजदार 69 संतोष दत्तात्रेय उफाडे पाटील , स फौ 340 धनंजय नाईक, स. फौ. 57 विलास इंगळे, पो.हवा. 520 शैलेंद्र पाटील, पो.हवा. 217 राज बच्छाव, पो कॉन्स्टेबल 307 सुभाष काळे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment