दिव्यांग व्यक्तींना सक्षम, आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्नशील - माजी खासदार समीर भुजबळ

कृत्रिम उपकरणे केवळ शरीराची पूर्तता नव्हे तर दिव्यांग बांधवांमध्ये आत्मभान, आत्मसन्मानाची भावना जागवतात - माजी खासदार समीर भुजबळ

नाशिक,येवला,दि.४ जुलै :- कृत्रिम अवयव ही केवळ साधने नाहीत, ती एका नव्या जीवनाची सुरुवात आहेत.
ही उपकरणे केवळ शरीराची पूर्तता करत नाहीत,तर दिव्यांग बांधवांमध्ये आत्मभान आणि आत्मसन्मानाची भावना जागवतात असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून अलिम्को,मुंबई यांचे मार्फत दिव्यांग व्यक्तीकरिता मोफत कृत्रिम अवयव व ज्येष्ठ नागरिकांना वयोश्री योजनेअंतर्गत मोफत कृत्रिम अवयव पुरवणे हेतू पूर्व तपासणी शिबिर येवला माऊली लॉन्स येथे पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, अरुणमामा थोरात, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, किसनराव धनगे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, विधानसभा उपाध्यक्ष दत्ता निकम, प्रा.प्रभाकर झळके, पप्पू सस्कर, प्रा.अर्जुन कोकाटे, मच्छिंद्र थोरात, सचिन कळमकर, संतोष खैरनार,अमजद शेख, मुश्ताक शेख, मलिक मेंबर, शफीक शेख, बालेश जाधव, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, सहायक गटविकास अधिकारी सुनील पाटील, अल्मिकोचे डॉ.हर्ष शर्मा यासह ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बंधू बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून आपण येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवासाठी आपण नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवीत आहोत. दिव्यांग व्यक्तीना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहे. हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नाही, तर ही सामाजिक बांधिलकीची साक्ष आहे, ही आपल्या प्रशासनाच्या संवेदनशीलतेची ओळख आहे, आणि ही आपल्या समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची दिशा असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आपल्या समाजात विविध कारणांमुळे काही व्यक्तींना शारीरिक अपंगत्वाचा सामना करावा लागतो. अपघात, जन्मतः दोष, किंवा काही आजारांमुळे अनेक जण हात, पाय, ऐकण्याची किंवा बोलण्याची क्षमता गमावतात. या शारीरिक मर्यादा दिव्यांग व्यक्तीच्या शिक्षणात, नोकरीत, प्रवासात, समाजातील सहभागात त्यांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतात. पण शारीरिक अपंगत्व म्हणजे जीवन संपले असे नव्हे. त्यांच्या प्रतिभा, क्षमता, इच्छाशक्ती आणि जिद्द यांचा आपण आदर केला पाहिजे. त्यामुळे गरज आहे ती त्यांच्या पुनर्वसनाची, त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याची. त्याच दृष्टीने आजचे हे शिबीर त्याच दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, शासनाने दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. “दिव्यांगजन सशक्तीकरण योजना”, “ALIMCO” या भारत सरकारच्या संस्था, तसेच सामाजिक न्याय विभाग, जिल्हा प्रशासन यांच्याद्वारे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. या योजनांचा उद्देश केवळ सहाय्य करणे नाही, तर दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवणे, त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या गुणवत्तेचा समाजाच्या विकासात उपयोग करून घेणे आहे. तसेच शासनाच्या वयोश्री योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना देखील कृत्रिम अवयव पुरविण्यासाठी तपासणी करण्यात येऊन त्यांना आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या जातील असे त्यांनी सांगितले. मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून राबविण्यात आलेल्या या शिबिराचे समन्वयक संतोष खैरनार यांच्यासह सहकाऱ्यांनी यशस्वी नियोजन केले. तपासणी नंतर मिळणार ही कृत्रिम अवयव व वस्तू
बॅटरीवरील सायकल, तीन चाकी सायकल, अंध विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट मोबाईल, पाठीचा पट्टा, कंबरेचा पट्टा, मानेचा पट्टा, वॉकर, कमोड खुर्ची, चाकाची घडीची खुर्ची, मतिमंद व्यक्तींसाठी, टीएमएल किट,कानाचे मशीन, काठी, नंबरचा चष्मा यासह विविध वस्तूंचा लाभ मिळेल.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला