कनिष्ठ अभियंता वैभव घुगे यांच्या भ्रष्टाचाराची मारहाण प्रकरणाची चौकशी होणार - गृहराज्यमंत्री योगेश कदम
सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार करणाऱ्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करणार - गृहराज्यमंत्री योगेश कदम
शिवसेना सहसंपर्कप्रमुख गणेश कदम यांनी वैभव घुगे यांची केली होती तक्रार
नाशिक :- त्र्यंबकेश्वर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ मधील कनिष्ठ अभियंता वैभव घुगे यांच्या शेकडो कोटींच्या कथित भ्रष्टाचार आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या मारहाणीच्या तक्रारींची दखल अखेर शासनाने घेतली आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून लवकरच चौकशी समिती प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू करणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना सह संपर्क प्रमुख गणेश कदम यांनी यापूर्वीच विशेष तपास पथक (SIT) नेमण्याची मागणी केली होती. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांसह तक्रारीमुळेच शासनाला या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे लागले. नागरिकांच्या तक्रारी, विभागातील आर्थिक गैरव्यवहार,आणि पदाचा गैरवापर करून निर्माण झालेल्या भयाच्या वातावरणाचा सखोल तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही चौकशी पारदर्शक व निष्पक्ष व्हावी यासाठी स्थानिक पातळीवरही दबाव वाढत आहे. तपासात दोषी आढळल्यास कठोर कारवाईची मागणी होत असून, शासनाच्या या पावलामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध जनतेला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
Comments
Post a Comment