प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते दरसवाडी धरणातून दरसवाडी डोंगरगाव कालव्याला पाणी
विडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करावी
येवला,दि.३१ जुलै :- मांजरपाडा प्रकल्पाद्वारे पुणेगाव धरणातून दरसवाडी धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. आज दरसवाडी धरण ओव्हर फ्लो झाले असून मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या हस्ते कालव्याचे चाक फिरवून दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याला पाणी सोडण्यात आहे. या मांजरपाडाच्या पाण्याने येवला तालुक्यातील सर्व बंधारे भरण्यात येणार आहे. या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या येवला लासलगाव मतदारसंघा बरोबरच चांदवड, आणि मराठवाड्याला जलसंजीवनी देणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी लवकरच येवला मतदारसंघात खळाळनार आहे.मांजरपाडा प्रकल्पाच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाची बरसात झाल्याने पुणेगाव मार्गे दरसवाडी धरण ओव्हरफ्लो झाले असून या प्रकल्पाचे जनक मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या सूचनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांच्या हस्ते जलपूजन केल्यानंतर चाक फिरवून हे पाणी येवल्याकडे मार्गस्थ करण्यात आले .यावेळी राष्ट्रवादी जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.मोहन शेलार, प्रा. ज्ञानेश्वर दराडे, सुनिल पैठणकर, भाऊसाहेब धनवटे,संतोष खैरनार, अंबादास पगार, राजेंद्र शेलार, सागर पगार, अरुण ठोंबरे,अशोक गोडसे,योगेश खैरनार, दत्तू शेलार,जालिंदर शेलार,रवींद्र शेलार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment