सुजाता करजगीकर यांची "भाजपच्या राज्य परिषदेवर निवड
नाशिक :- राज्य परिषद ही भाजपच्या संघटनात्मक रचनेतील एक महत्वाची समिती आहे.ही पार्टीच्या धोरणात्मक निर्णयांवर चर्चा करणारी आणि संघटनात्मक दृष्टीकोनातून मार्गदर्शन करणारी राज्य पातळीवरील संघटना आहे.राजकीय धोरण ठरविणे,नवीन कार्यपध्दती ठरविणे,निवडणूक व्यवस्थापन,जनसंपर्क,प्रचार तंञ,याबाबत दिशा देणे.कार्यकर्त्याना प्रशिक्षित करण्यासाठी शिबीरे,कार्यशाळा आयोजित करणे.इ.विषयावर चर्चा करणे.यावर निर्णय घेणे.राजकीय घडामोडीवर चर्चा करण्यासाठी बैठका घेणे व ठराव पारित करणे. सक्रिय सहभाग निष्ठा,जनसंपर्क,नेतृत्व गुण,आणि संघटनात्मक कौशल्य या आधारावर ही नियुक्ती केली जाते.राज्य परिषदेवर मुख्यमंञी,प्रमुख नेते,आमदार,मंञी,खासदार त्याबरोबरबर त्या त्या जिल्हातील शिफारस केलेले पदाधिकारी या समितीत असतात.नाशिक महानगरातून सुजाता करजगीकर, यांची निवड करण्यात आली.त्या १९८९ सालापासून संघटनेत कार्यरत असून एकनिष्ठ यांची दखल घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,संघटनमंञी रवि अनासपुरे, नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष सुनिल केदार, लक्ष्मण सावजी,आ.देवयानी फंरादे,सौ सीमा हिरे ,आ.राहूल ढिकले,यांचे त्यांनी आभार मानले.त्यांच्या निवडीचे विविध क्षेत्रातून अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment