कमी बोलून जास्त काम करणारी माणसे जीवनात यशस्वी - ॲड. नितीन ठाकरे
नाशिक : भेंडाळी येथे सायखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत खालकर यांच्या आयोजित कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी बोलताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर
सायखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत खालकर यांचा कृतज्ञता सोहळा
नाशिक :- आयुष्यात कमी बोलणे आणि जास्त काम करणे, असा स्थायीभाव असणारी माणसे जीवनात यशस्वी यशस्वी होत असतात. अशा माणसांच्या कर्तृत्वाने समाज घडत असतो, असे गौरवोद्गगार मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी काढले. सायखेडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत खालकर यांच्या भेंडाळी येथे आयोजित कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे माजी अध्यक्ष अरविंद कारे होते.सायखेडा येथे महाविद्यालयात प्राचार्य म्हणून भेंडाळीचे भूमिपुत्र श्रीकांत खालकर हे दोन महिन्यांपूर्वी रुजू झाले. त्यांनी समाजाप्रती, गावाप्रती, आपल्या संस्थेप्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा देत सेवेतील अनुभवाची अनुभूती करत सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे, म.वि.प्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेठे, मविप्र संचालक शिवाजी गडाख, संचालिका शोभा बोरस्ते, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोकुळ गिते, मविप्र शिक्षणाधिकारी भास्कर ढोके, दिगंबर गिते, भागवत बोरस्ते, प्रभाकर रायते, निर्मला खर्डे, पिंपळगाव मार्केट कमिटी संचालक सोपान खालकर, सुरेश कमानकर, अशपाक शेख, भाऊसाहेब कमानकर आदी मान्यवर उपस्थित होते. विजय खालकर यांनी प्रास्ताविक तर प्राध्यापक घुले यांनी सूत्रसंचालन केले. प्राध्यापिका दीपाली खालकर यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment