निफाडला राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा


रक्तदान शिबिरासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 
जिल्हाभरातील शेकडो नागरिकांची उपस्थिती
निफाड :- निफाडला हिंदू धर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा होळकर राजघराणे वंशज नानासाहेब होळकर यांच्या अध्यक्षतेखाली भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. यावेळी महापुरुषांना अभिवादन करून रक्तदान शिबीराच्या माध्यमातून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच जन्मोत्सव सोहळ्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.सर्व जाती धर्मातील जनतेने एकत्र येऊन सदर सोहळ्याचे नियोजन केले होते.याप्रसंगी कर्नाटकजवळील जत येथून धनगरी ओव्या गाणारे सत्यवान गावडे महाराज यांच्या टीमने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा कार्यइतिहास सवाद्य ओव्यांच्या माध्यमातून अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने सादर करीत निफाडनगरी दुमदुमून टाकली. यावेळी आहिल्यादेवी आरती व फोटो उपस्थितांना वाटण्यात आले.तसेच इतिहास अभ्यासक रामदास काळे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन चरित्र व होळकर शाहिच्या इतिहासावर व्याख्यान झाले. यावेळी व्याख्याते काळे यांनी अहिल्यादेवींचे कार्यकर्तृत्व उभेऊब डोळ्यासमोर उभे करून निफाड शहर व परिसराचा समृद्ध इतिहास नागरीकांसमोर मांडला. याप्रसंगी होळकर राजकारण्याचे वंशज माजी नगराध्यक्ष मुकुंदराजे होळकर, सरदार राजोळे घराण्याचे वंशज भाऊसाहेब राजोळे,गुरुवर्य वि दा व्यवहारे,मल्हार सेना सचिव मच्छिंद्र बिडगर,समाधान बागल, निफाडच्या नगराध्यक्ष रत्नमाला कापसे,उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, नगरसेवक सागर कुंदे, नगरसेवक जावेद शेख, नगरसेविका सुलोचना होळकर यांसह सुनीता कुंदे,डॉ सीमा डेर्ले, ज्येष्ठ नेते शिवाजी ढेपले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकरराव शेलार, सोसायटी संचालक बापूसाहेब कुंदे, संपत डुंबरे, प्रकाश सुराणा, शिवाजी सुपनर,भास्कर जाधव,विनायक काळदाते,बाळासाहेब कापसे, संपर्कप्रमुख नवनाथ ढगे,दत्तू बोडके,गणेश निंबाळकर,सुरेश उशीर, शाम गोसावी, ऍड इंद्रभान रायते,डॉ उत्तम डेर्ले, ऍड प्रवीण ठाकरे,अविनाश बागडे,सुभाष खाटेकर,ऍड फिरोज इनामदार,अश्विनी होळकर,तीलोत्तम होळकर,सुनंदा होळकर अश्विनी होळकर,मालती आचट,संपतराव ढोबळे, संजय घुमरे, बाळासाहेब होळकर, राजाभाऊ खेमनार,अण्णासाहेब सापनार,वैभव रोकडे, संजय धारराव आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. यावेळी राजघराणे वंशज नानासाहेब होळकर यांचा काठी घोंगडी देऊन सन्मान करण्यात आला तर आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू खंडू कोटकर यांना अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर सिनेमाचे प्रमोशनही मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येऊन कलाकार सुशांत सोनवणे, हर्षदा अंबारे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मनोगतात मच्छिंद्र बिडगर यांनी असे सार्वजनिक सोहळे प्रत्येक ठिकाणी झालेच पाहिजेत असे सांगितले.तर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष ऍड श्रीकांत रायते यांनी उपस्थितांचे स्वागत तर समाधान बागल यांनी प्रास्ताविकातून समितीचे ध्येय धोरणे स्पष्ट केले. याप्रसंगी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष ऍड श्रीकांत रायते,उपाध्यक्ष राहुल दवते, जगन काकडे, स्वागताध्यक्ष सुनील कुमावत, सोमनाथ धुमाळ, संदीप क्षीरसागर, शुभम काळे सोपान सुडके, कार्याध्यक्ष संजय कुंदे,ऍड अनुप वनसे, वैभव कापसे, सचिन धारराव, नवनाथ धारराव,दत्ता आरोटे, दत्तात्रेय साप्ते, दीपक शिंदे, अमोल पाचरणे,जयेश जगताप,समिती सदस्य गोविंद कांदाळकर,खंडू किट्टे,सुधीर कर्डिले,सुबोध व्यवहारे,श्याम चौधरी,सोमनाथ धुमाळ,शाम गोसावी,संजय घुमरे, तुकाराम कांदाळकर,ओमकार होळकर,दुर्गेश होळकर,अभिषेक होळकर ,विपुल सैंद्रे, कल्पेश साळे,आकाश मोरे,राहुल ढेपले,हेमंत शिंदे,देवराम शिंदे, समाधान धोंगडे,ज्ञानेश्वर ढेपले,अनंत काळे,अनिल शिंदे,दीपक शिंदे,प्रकाश साळवे,शुभम काळे,समाधान घुमरे, सूर्यभान सुडके,सोपान सूडके, देवराम शिंदे, कैलास साप्ते, आकाश मोरे,दत्ता जाधव,घनश्याम सैंद्रे,लंकेश सोनारे,दीपक सोनारे, वाल्मीक जाधव, दिलीप जाधव यांसह मोठया संख्येने जिल्हाभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले तर आभार गोविंद कांदळकर यांनी मानले,रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या सोहळ्यास नागरिकांची शेवटपर्यंतची उपस्थिती ही लक्षणीय दिसली.

छायाचित्र - राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला