नाशिक गोदाघाट रामकुंड पंचवटी येथे अहिल्यादेवी जन्मोत्सव सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा
नाशिक : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित सोहळा मोठ्या थाटामाटात साधुसंत महंत होळकरशाहीचे वंशज राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व जाती धर्मातील जनतेच्या सहभागातून भव्य दिव्य स्वरूपात सोहळा साजरा झाला यामध्ये पाच दिवसीय सप्ताह ठेवून 28 मे ते एक जून पर्यंत हा सोहळा पार पडला यामध्ये 31 मे रोजी सायंकाळी पंचवटी रामकुंड या ठिकाणी गोदा आरती व अहिल्यादेवी आरती मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आली तसेच या सोहळ्यासाठी होळकर शाही चे मामाचे वंशज अमरजीत दादा बारगळ,महंत भक्तीचरणदास महाराज,सतीश शुक्ला गुरुजी ,योगेश महाराज गवारे, तसेच मा.राज्यमंत्री शोभाताई बच्छाव, दिगंबर मोगरे, नवनाथ ढगे, दत्तू बोडके, विनायक काळदते, आदी सोहळ्यासाठी उपस्थित होते. भव्य दिव्य सोहळा गोदावरी तीरावर मोठ्या उत्साहात बहुसंख्य जनतेच्या साक्षीने पार पडला. यावेळी २९८ जयंतीनिमित्त २९८ वैवाहिक जोडप्यांच्या हस्ते गोदावरी, आहिल्यादेवी आरती करण्यात आली. एक जून रोजी सायंकाळी सात वाजता यशवंत पटांगण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच साधू संतांच्या आशीर्वादाने होळकर शाहीचे वंशज. तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत इंदूर राजघराणे चे राजे यशवंत महाराज होळकर यांनीही पॅरिस वरुन दुरध्वनी द्वारे नाशिक मध्ये संवाद साधून सर्व नाशिककरांना आहिल्यादेवी जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.प्रसंगी तळोदा संस्थानचे जहागीरदार अमरजीत दादा बारगळ, दिगंबर आखाड्याचे महंत भक्तीचरणदास महाराज, होकरशाहीचे वंशज मुकुंद राजे होळकर, लक्ष्मण नजन, भाऊसाहेब राजोळे, योगेश धरम, शैलेश धारे,प्रहार उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, ओंकार शाळेचे इतिहासकार रामभाऊ लांडे,महावितरण चे डेप्युटी इंजिनियर विनोद ढोरे, काळदाते साहेब,नवनाथ ढगे,भास्कर जाधव, विनायक काळदाते अहिल्यादेवी सिनेमा निर्माते सोनवणे व सर्व कलाकार याप्रसंगी उपस्थित होते. तसेच सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल,यांनी यावेळी प्रास्ताविक केले समितीचे ध्येयधोरणे मांडले काही गोष्टींचे मागणी त्यांनी केली नाशिक येथील गोदाघाटावर अहिल्यादेवींनी काशी विश्वेश्वर मंदिर बांधले या ठिकाणी अश्वारूढ पुतळा आहिल्यादेवी होळकर यांचा व्हावा. तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये अहिल्यादेवी होळकरांचा एक स्मारक असावे, तसेच हिंदुस्तानची महिला शासक हिंदू धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त सोहळ्याची माहिती दिली. यावेळी प्रमुख सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील व्याख्याते लक्ष्मण नजन सर, यांचे व्याख्यान अहिल्या जन्मोत्सव निमित्त जोरदार भाषण शैलीमध्ये झाले. त्याचप्रमाणे त्यांनी अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवानिमित्त मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर अतिशय सुंदर शब्दात व्याख्यान दिले,अहिल्यादेवी होळकर यांनी या भारत देशाचा शेकडो वर्षाचा सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवण्याचे महान कार्य केले आहे. त्यांनी अडीचशे वर्षांपूर्वी केलेले लोक कल्याणकारी कार्य आजही अनेक ठिकाणी असलेल्या तलावाच्या, बारवच्या,मंदिरांच्या, रूपाने जिवंत आहे. त्यांच्या असामान्य नेतृत्व गुणाला पैलू पाडण्याचे काम त्यांचे पितृतुल्य सासरे मल्हारराव होळकर यांनी केले होते. सासरे मल्हारराव होळकर हे आठराव्या शतकातील उच्च राजनैतिक गुण असलेले, अंधश्रद्धा न पाळणारे, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. असे अनेक परदेशी इतिहासकारांनी मत नोंदवले आहे .याच असामान्य व्यक्तिमत्व सासरे मल्हारराव होळकरांचे संस्कार अहिल्यादेवी होळकर यांना मिळाले होते. असे व्याख्याते लक्ष्मण नजन यांनी सांगितले.यावेळी उपस्थित सर्व नाशिककरांना आपल्या अमोघ वाणीतून मंत्रमुग्ध केले. यामध्ये महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या अहिल्यादेवी पुरस्कार च्या धरतीवर कार्यक्रमात एका महिलेला आहिल्या रत्न पुरस्कार अलका सुखदेव सपनार यांना देऊन सन्मानित करण्यात आले त्या एकाच घरातील चार अपंग भावंडे व घरदार सांभाळून जीवन व्यतीत करत आहेत.त्यांचे उपस्थितांनी केले. प्रसंगी अनेक मान्यवरांना काठी घोंगडी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या सोहळ्याचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष ऋषिकेश धापसे यांनी मनोगत व्यक्त केले. एकपात्री नाटक स्वाती गजबार यांनी सादरीकरण केले. अतिशय सुंदर शब्दांमध्ये मांडले.भक्ती चरणदास स्वामी यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये अहिल्यादेवी होळकरांचे जीवन चरित्रावर अयोध्याच्या, हिंदुस्तानच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या कामावरती प्रकाश टाकला. तसेच सोहळ्याचे अध्यक्ष तळोदा संस्थानचे जहागीरदार अमरजीत दादा बारगळ यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याची घोषणा झाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले सोहळा इतका भव्यदिव्य स्वरूपात साजरा केला त्याबद्दल समितीचे अभिनंदन केले. राजे यशवंतराव होळकर यांच्या पर्यंत हा संदेश दिला जाईल असे अश्वासन अमरजीत दादा बारगळ,यांनी यावेळी दिले.त्याचप्रमाणे सोहळा पार पाडण्यासाठी समितीचे अध्यक्ष स्वागत अध्यक्ष कार्याध्यक्ष या सर्व टीमने मेहनत घेतली यामध्ये अमोल गजभार, प्रशांत बागल, अण्णासाहेब सपनार, श्याम गोसावी, वैभव रोकडे विजय काळदाते पांडुरंग शिंदे, भूषण जाधव,ऋषिकेश शिंदे, देवराम रोकडे, राजाभाऊ बदड, संदीप क्षीरसागर, चंद्रभान रहाटळ, जगन काकडे, हेमंत शिंदे, डॉ. कापडणीस, सत्यम बागल, पप्पू हुलगडे, विशाल बागल, यांच्यासह मार्गदर्शक स्वरूपात असलेल्या सर्व ज्येष्ठांनीही हा सोहळा पार पाडण्यासाठी विषेश प्रयत्न केले. तसेच जन्मोत्सवाच्या सोहळ्याचे आभार प्रदर्शन विनायक काळदाते यांनी केले.
Comments
Post a Comment