मखमलाबाद विद्यालयात नविन विद्यार्थ्यांचे स्वागत व पाठ्यपुस्तके वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मखमलाबाद :- (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी नविन प्रवेश घेतलेल्या इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण व गुलाबपुष्प देऊन स्वागत तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटपाचा कार्यक्रम मविप्र संचालक रमेश पिंगळे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले.त्यांनी शालेय गुणवत्ता व शिस्त या संदर्भात मार्गदर्शन करुन सर्व विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीतमंचाने "पाटी न पुस्तक" हे स्वागतगीत सादर केले.मविप्र संचालक रमेश पिंगळे यांचे स्वागत प्राचार्य संजय डेर्ले यांनी केले.तसेच नवनियुक्त प्राचार्यांचे स्वागत संचालकांच्या शुभहस्ते करण्यात आले व त्यांनी विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.आज शाळेच्या शैक्षणिक वर्षाचा पहीलाच दिवस असल्यामुळे प्रवेशद्वारावर व शालेय परिसरात रांगोळ्या काढुन,फलकरेखाटन करुन सजावट करण्यात आली होती.सुत्रसंचलन जेष्ठ शिक्षिका वैशाली देवरे यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका माधुरी थेटे यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला