विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा हाच आमचा दृष्टिकोन अध्यक्षा हेमलता बिडकर
आंबेगण :- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आंबेगण या शाळेत अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा हेमलता ताई बिडकर यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी उपाध्यक्ष दामोदर ठाकरे, संचालक प्रभाकर पवार,अ.प्र.देशपांडे, चंद्रात्रे सर, अनिल पंडित, भाऊसाहेब, लेखापाल पारिख साहेब, राजेंद्र म्हसदे आदी उपस्थित होते.
हेमलता ताई बिडकर यांनी विद्यार्थी व शिक्षक यांनी चांगल्या प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आलेल्या साहित्याचा वापर करून संस्थेचे व शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करावा, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने दिलेल्या अटल टिंकरिंग लॅब सुरू केल्या आहेत. याचा जास्तीत जास्त लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.
संस्थेचे उपाध्यक्ष दामोदर ठाकरे व संचालक पदाधिकारी यांनी अटल लॅबची पाहणी करून सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.तसेच अटल लॅबचे जिल्हा समन्वयक श्री. आढाव व सहकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक संदिप कुमावत व शिक्षक हेमंत भामरे यांनी अटल लॅबचे महत्त्व पटवून दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक भानुदास गोसावी यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment