गोदाकाठी एका गरीब कुटुंबातील चार अपंग भावंडे असलेल्या आईला मिळाला अहिल्या रत्न पुरस्कार
नाशिक : राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समितीमार्फत 28 मे ते एक जून दरम्यान हा सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये अनेक सांस्कृतिक धार्मिक एकपात्री नाटक , लक्ष्मण नजन सर यांचे व्याख्यान पार पडली यामध्ये मुख्य आकर्षक वाटले ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी गोरगरिबांसाठी मुक्या जनावरांसाठी हिंदू धर्मासाठी जे कार्य केले तसेच संपूर्ण हिंदू धर्मात धार्मिक ठिकाणी मंदिरी मधली नदीकाठी घाट मांडले मज्जिद या मधल्या गोरगरिबांसाठी पिण्याचे सुविधा करण्यासाठी बारव बांधले या विचारांची ध्येय लक्षात घेऊन समितीच्या वतीने एक अहिल्या रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला महाराष्ट्र शासनाने केलेल्या घोषणेनुसार अहिल्या रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला सिन्नर तालुक्यातील उजनी एका गरीब कुटुंबातील स्त्रीला हा अहिल्या रत्न पुरस्कार समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान भाऊ बागल यांनी प्रास्ताविक मध्ये हा पुरस्कार जाहीर केला या कुटुंबातील चार अपंग भावंडे आहेत व त्यांचे पती काही आजारी असल्याकारणाने फक्त एक महिला चालवते इतकी दुःख असतानाही महिला डगमगली नाही आणि आपल्या संसाराचा गाडा चालवत राहिली ज्या अहिल्यादेवी ने श्री असतानाही संपूर्ण राज्याचा कारभार चालवला संपूर्ण मावळ प्रांतात आपली गोरगरीब जनतेसाठी राज्य कारभार केला याच उद्देशाने एक वेगळा आदर्श समाजापुढे आहे अशा अलका सुखदेव सपनर र यांना हा पुरस्कार देण्यात आला. एक वेगळा आदर्श समाजापुढे आहे नेतेमंडळी फक्त राजकीय स्वार्थापोटी समाजकार्याचे गुणगान गाता त्यामुळे समाजातील राजकीय नेत्यांनी खालच्या थरावरील सर्वसाधारण जनता व अशा कुटुंबाकडे लक्ष देणे जरुरी आहे या उद्देशानेच हा अहिल्या रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. यानिमित्त या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सोलापूर समितीचे संस्थापक अध्यक्ष समाधान बागल यांनी प्रास्ताविक केली व काही मागण्या मांडल्या समिती अध्यक्ष ऋषिकेश ढापसे यांनी स्वागत केले.
Comments
Post a Comment