वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा सहकक्ष प्रमुख पदी कृष्णा देशमुख यांची नियुक्ती
नाशिक : दिंडोरी -: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सूचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा सहकक्ष प्रमुख पदी कृष्णा देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली, राज्य कक्षप्रमुख राम राऊत यांच्या हस्ते कृष्णा देशमुख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले, यावेळी व्यासपीठावर सहसंपर्क प्रमुख राजेंद्र लवटे, शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख बंटी तिदमे, शिवसेना नेते गणेश कदम, वैद्यकिय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख योगेश म्हस्के, वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य विस्तारक डाँ प्रथमेश पाटील उपस्थित होते, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आपण गोर-गरीब, गरजू आणि आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात राखीव खाटा उपलब्ध करून देत गरीब रुग्णांवर पुर्णतः मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यासंदर्भातील मदत करत मार्गदर्शनासाठी सदैव तत्पर राहू असे कृष्णा देशमुख यांनी सांगितले, यावेळी यश बच्छाव, तुषार भोसले, आकाश आहेर, सौरभ जाधव, संकेत देशमुख, मयूर देशमुख, किरण देशमुख, मयूर भुजाडे, महेश मोगल, अजिंक्य दिघे, साई दळवी, साहील देशमुख, दर्शन देशमुख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment