मखमलाबाद विद्यालयात जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात साजरा
मखमलाबाद : मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे "जागतिक ऑलिम्पिक दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्ट्रीय खेळाडु अंबादास तांबे हे उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपिठावर प्राचार्य संजय डेर्ले,अभिनवचे मुख्याध्यापक सी बी पवार,पर्यवेक्षिका माधुरी थेटे,जेष्ठ क्रिडाशिक्षक दिलीप सोनवणे,नितीन जाधव,नितीन भामरे,ज्युनियर काॅलेज क्रिडाप्रमुख डेर्ले सर आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल कु.अश्विनी रामदास तुंबडे,इ.9 वी ड या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला.प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते क्रिडाज्योत पेटवून क्रिडांगणावर धावपट्टुंनी फेरी मारली.अंबादास तांबे यांनी विद्यार्थ्यांना निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी खेळांमध्ये भाग घेतला पाहिजे.तसेच आपल्या जीवनात खेळाचे किती महत्व आहे हे पटवून दिले.आॅलिम्पिक विषयी हॅन्डबॉल खेळाडू कु.चंदना वाघेरे हिने सविस्तर माहीती सांगितली.सुत्रसंचालन क्रिडाशिक्षक नितीन जाधव यांनी तर आभार प्रदर्शन दिलीप सोनवणे यांनी केले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment