ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव व पालक मेळावा संपन्न
आंबेगण ( प्रतिनिधी समाधान शिरसाठ )- डांग सेवा मंडळ नाशिक संचलित ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आंबेगण येथे दि.१५ जुन २०२३ गुरुवार रोजी विद्यार्थी प्रवेशोत्सव व पालक मेळावा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र गायकवाड (अध्यक्ष शा.पो.आ.) तर प्रमुख पाहुणे म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नाशिक येथील शरद निळे साहेब, ग्रा.पं.आंबेगण येथील सरपंच सुरेश वाघ व पालक सदस्य राजु कलवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती चौधरी यांनी इशस्तवन तर शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संदिप कुमावत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शाळेचा परिचय व शाळेचा विकासाचा आलेख स्पष्टपणे सांगितला.
या कार्यक्रमात दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम आलेल्या तिन विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.
आलेल्या सर्व विद्यार्थी व पालक यांच्या साठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माध्य.शिक्षक बी.एन.गोसावी यांनी केले.
या कार्यक्रमात बहुसंख्य पालक वर्ग विद्यार्थी तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment