मखमलाबाद विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त भव्य-दिव्य दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
मखमलाबाद (प्रतिनिधी समाधान शिरसाठ ) — मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथे आषाढी एकादशीनिमित्त विठूराय माऊलींची भव्य-दिव्य दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रास्ताविक जेष्ठ शिक्षिका योगीता कासार यांनी केले.त्यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्व सांगितले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन मविप्र संचालक रमेश पिंगळे हे उपस्थित होते.त्यांनी आपल्या शुभहस्ते पालखी व विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला.याप्रसंगी प्राचार्य संजय डेर्ले,शिक्षकवृंद उपस्थित होते.
संगीत शिक्षक तुकाराम तांबे व गीतमंच यांनी विठ्ठलाची सुरेल आरती,अभंग सादर केले.प्रमुख पाहुण्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शालेय परिवाराला आषाढी एकादशीनिमित्त हार्दीक शुभेच्छा दिल्या.शालेय परिसर व मखमलाबाद गावातून अतिशय सुंदर पध्दतीने भव्य-दिव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या दिंडीमध्ये कु.प्रज्योत अमोल सोनवणे व कु.काजल प्रविण बोरसे यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभुषा साकारलेली होती.दिंडीत टाळ मृदुंगाच्या तालात सर्व विद्यार्थी नाचण्यात दंग होऊन गेले होते.
विठुरायाच्या नामघोषाने,अभंगांनी सर्व परिसर दुमदुमुन गेला होता.मखमलाबाद बस स्टँड व शालेय क्रिडांगणावर गोल रिंगण सोहळा अतिशय भक्तिभावाने उत्साहात पार पडला.याप्रसंगी विद्यार्थिनींनी, शिक्षकांनी पारंपारिक फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पारंपारिक वारकर्यांची वेशभुषा परिधान केली होती.सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षक दिलीप सोनवणे व योगीता कासार यांनी केले.या सहभागी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक,सर्व शिक्षकवृंदांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment