बागलाण तालुक्यात प्रहारच्या विविध गावांमध्ये जिल्हाध्यक्ष ललित पवार यांच्या हस्ते शाखांचे अनावरण

बागलाण : प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या शाखा फलकाचे अनावरण बागलाण तालुक्यातील दरेगाव, अंबासन व उतराणे या ठिकाणी प्रहार दिव्यांग संघटना नाशिक चे जिल्हाध्यक्ष  ललित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, प्रारंभी अंबासन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष  ललित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले, प्रहार ची पाळेमुळे खोलवर रुजली असुन दिव्यांग कल्याण राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु नी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाल्याचे जिल्हाध्यक्ष  ललित पवार यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले, अंबासन ग्रामपंचायतीने दिव्यांगांसाठी स्वतंत्र कार्यालय उपलब्ध करून दिल्याने ग्रामपंचायत प्रशासनाचे व स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे ही पवार यांनी आभार मानले, या वेळी उपस्थित दिव्यांगांना विविध शासकीय योजनांची माहिती जिल्हा कार्याध्यक्ष बबलु मिर्झा यांनी दिली, या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष  ललित पवार, कार्याध्यक्ष  बबलु मिर्झा तालुकाध्यक्ष नाना कुमावत,तालुका उपाध्यक्ष हिम्मत माळी शहराध्यक्ष प्रकाश पगार, संघटक किरण गांगुर्डे शाखाप्रमुख दिनेश पवार, दुर्गाबाई आहीरे,महेंद्र पगार गणेश काकुळजे, मोठ्या प्रमाणात गावकरी दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला