जलसंपदा सरळ सेवा भरती परिक्षेत यश मिळवत ज्युनिअर इंजिनिअर या पदावर निवड झाल्याने धांद्री ग्रामस्थांच्या वतीने क्रांती चव्हाण यांचा नागरी सत्कार
सटाणा : धांद्री गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगी क्रांती संजय चव्हाण, झाली इंजिनिअर
बागलाण तालुक्यातील धांद्री येथील शेतकरी कै केदा रघुनाथ चव्हाण यांची नात कुमारी क्रांती संजय चव्हाण जलसंपदा सरळ सेवा भरती परीक्षेत नाविन्यपूर्ण यश संपादित करुण ज्युनिअर इंजिनिअर या पदावर निवड झाली आहे. सन 2022 मध्ये क्रांतीने मुंबई येथे परीक्षा दिली होती. या परीक्षेत क्रांती चव्हाण यांनी यश संपादन करुन गावातील शेतकरी कुटुंबातील क्रांती चव्हाण यांनी शासकिय पदावर इंजिनिअर होण्याचा बहुमान मिळविला आहेे. कागदपत्रे पडताळणी झाली असुन लवकरच पदावर त्या रुजू होणार आहे.हि बातमी गावात समजताच गावकर्याच्या वतीने भव्य स्वागत करुण क्रांती चव्हाण यांंचा, स्वागत करुन सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment