जय हो ट्रान्सपोर्ट कंपनीचे १६ लाख४०हजाराचे स्टील ट्रकसह चोरी झाल्याचा बनाव करून विकले. जय हो ट्रान्सपोर्ट कंपनी मालक यांचे नाशिक पोलीस आयुक्त, यांच्यासह गृहमंत्री,ठाणे ग्रामीण अधीक्षक, मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई उच्च न्यायालयात तक्रार अर्ज देत न्यायाची मागणी


छत्रपती संभाजी नगर चे खासदार इम्तियाज जलील यांचा याप्रकरणातील विडीओ
https://youtu.be/AXp8kDLBQ1o
नाशिक : परस्पर ट्रकची नंबर प्लेट बदलून एमआयडीसी छत्रपती संभाजी नगर जालना येथील जय हो ट्रान्सपोर्ट कंपनीचे स्टील ट्रक सह विकले ट्रक चोरीचा खोटा गुन्हाही दाखल केला. जय हो ट्रान्सपोर्ट कंपनी मालक, शेख मुद्दसीर शेख नसीर राहणार मालीपुरा जुने जालना यांनी पोलीस आयुक्त नाशिक, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालयात तक्रार अर्ज देत,सदर प्रकरणात संबंधित खोटी फिर्याद दाखल करणारे इसमाची चौकशी होवून त्यांच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल होऊन कडक कारवाई होण्याची मागणी त्यांनी केली आहे.यातील वरील सर्व संबंधित शासकीय कार्यालयात देण्यात आलेला तक्रार अर्ज असा आहे की मी शेख मुद्दसीर शेख नासीर हे मालीपुरा जुने जालणा याठिकाणी राहतो माझी जय हो ट्रान्सपोर्ट कंपनी एम आय डी सी छत्रपती संभाजी नगर रोड जालना येथे असुन १४ ते १५ वर्षांपासून मी याठिकाणी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत आहे दिनांक २६/११/२०२२ रोजी एस आर जे पीटी स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे भाडे हे मुद्दसीर शेख जय हो ट्रान्सपोर्ट कंपनी मालक यांनी ट्रकमालक चालक वाल्मिक माधव ईप्परदास यास ठरविले दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांचा टाटा कंपनीचा टीसी ३११८ ट्रक क्रमांक एम एच १५ डिके २३५५ यामध्ये टीएमटी बार्स स्टील सळई भरण्या कामी हा ट्रक एस आर जे पीटी स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये (डी-५१/१ ऑडिशनल एमआयडीसी जालना) लावला सदर ट्रकमध्ये २५ टन १२० किलो वजनाचे स्टीलची सळई भरून गाडीचे टपाल रेडी करून सदर ट्रक हा दहा वाजून 30 मिनिटांच्या सुमारास कंपनीतून बाहेर पडला.सदर ट्रकमध्ये जालना छत्रपती संभाजी नगर रोडवरील आशिष पेट्रोल पंपावर दहा हजार रुपयांचे डिझेल भरून दिल्यानंतर सदर गाडी ११.१५ वाजता जालना येथून नाशिक येथील जानवी स्टील या कंपनीत स्टील सळई पोच करण्याकामी निघाला साधारणत: सकाळी ९ वाजता नाशिक मध्ये पोहोचणे अपेक्षित असताना सदर ट्रक हा २७/११/२०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजता  पोहोचला. सदर ट्रक हा दिनांक २७/११/२०२२ रोजी ५:३० वाजता पोहोचल्यावर सदर ट्रकचालक वाल्मीक माधव ईप्परदास याने जान्हवी स्टीलचे मालक अजित पटेल यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून त्यांना माल खाली करण्याचे सांगितले.मात्र कामगार निघून गेल्याने सकाळी सहा वाजता माल खाली कर असे सांगून ट्रक हा दुकानासमोर पार्क कर असे सांगितले परंतु ट्रक चालक वाल्मीक माधव इप्परदास यांने सदर ट्रक हा तेथे पार्क न करता त्याचा साथीदार अझरुद्दीन मोहम्मद सादिक शेख याच्याबरोबर संगणमत करून ओम स्टील मुंबई आग्रा रोड पडघा याचे मालक राघवेंद्र सिंग व दिपू हरिपाल सिंग यांच्या सांगण्यावरून त्यांचा मॅनेजर कैलास सपाट यांनी कैलास नगर मिरची हॉटेल येथील पेट्रोलपंपाच्या अकाउंटवर दहा हजार ट्रान्सफर केले त्यापैकी सदर ट्रक चालक यांनी ४५०० रुपये किमतीचे डिझेल हे सदर ट्रकमध्ये टाकले व रुपये ५५०० हे अझरुद्दीन मोहम्मद सादिक यास देत सदर ट्रक हा धोबी घाट टाकळी रामदास स्वामी पुलाजवळील रस्त्याच्या कडेला उभा करून चोरी झाल्याचा बनाव करून सदर ट्रक हा अझरुद्दीन मोहम्मद सादिक शेख व त्याचे साथीदारांनी नाशिक येथून एम एच १५ डिके २३५५ या ट्रकची नंबर प्लेट बदलून एम एच १८ एम ८४३५ अशी भासवून पडघा तेथे नेऊन तेथील ओम स्टीलच्या मालकास सदर स्टील विक्री केले सदर स्टील विक्री करताना ट्रक नंबर एम एच १८ एम ८४३५ असा भासवून सदर स्टील ट्रक चोरी झाल्याची जिचा नंबर एम एच१५डिके २३५५ हा होता अशी खोटी फिर्याद देऊन शेख मुद्दसीर शेख नसीर यांचा व एस आर जे पी टी स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा विश्वासघात करून परस्पर टीएमटी बार्सची (स्टील सळई) विक्री केली व सदर ट्रकची मालासह चोरी झाली असे भासवून उपनगर पोलीस ठाणे नाशिक येथे ट्रक चोरी गेल्याचा बनाव केला व चोरीची फिर्याद दिली. या प्रकरणी सदर तपास कामी उपनगर पोलीस ठाणे येथे शेख मुद्दसीर शेख नसीर यांनी अनेक वेळा दाद मागण्यासाठी गेलो असता पोलिसांच्या बदलीचे कारण देत सदर गुन्ह्यात अंदाजे १८ ते २० दिवस कोणत्याही प्रकारचा तपास झाला नाही तसेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांनी सदर ट्रक चोरी झाल्याची फेसबुक या सोशल मीडियावर टाकल्यानंतर व ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संबंधित यंत्रणा यांनी तपासकामी ट्रक चालक व त्याचा मित्रास चौकशी कामी बोलवून घेत सदर ट्रक कुठे आहे व त्याचे काय झाले अशी चौकशी केली असता त्यांनी राघवेंद्र सिंग,दिपू हरिपाल सिंग, यांच्या सांगण्यावरून सदर ट्रक चोरी करून सदरचा चोरीचा मुद्देमाल त्यांना विकला व त्या बदल्यात अझरुद्दीन मोहम्मद सादिक शेख यांच्या पत्नी परीनं अझरुद्दीन शेख यांच्या अकाउंटवर फोन पे द्वारे ६८ हजार व आणखी काही रक्कमही ट्रान्सफर केली असल्याचे शेख मुद्दसीर शेख, नसीर जय हो ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालक यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी त्यांना अशी माहिती दिली की राघवेंद्र सिंग,  दिपू हरिपाल सिंग,यांनी सदरचा चोरीचा माल संगणमत करून विकत घेऊन त्याची परस्पर विक्री केली याबाबत शेख मुद्दसीर शेख नसीर यांनी सर्व संबंधित यंत्रणेला दिलेल्या पत्रात उल्लेख केला आहे. पोलिसांकडून माहिती मिळाल्यावर शेख मुद्दसीर शेख नसीर हे राघवेंद्र सिंग, व दिपू हरिपाल सिंग, यास भेटण्याचा आठ ते दहा दिवस प्रयत्न करीत होते ते त्याना भेटले असता त्यांनी सांगितले की, तेरा माल हम बेच खाये तु चिंता मत कर तेरे को मालका पुरा पैसा दे देते है दिनांक  २७/१२/२०२२ रोजी मी मुदस्सर शेख यांनी दिवसभरात पाच वेळा राघवेंद्र सिंग यांना मोबाईलवर संपर्क केला त्यांना राघवेंद्र सिंग यांने विश्वास दिला की तेरे पहचान का शहापूर का कोई व्यापारी होगा तो मै उसके पास १५ लाख ४० हजार रुपये दे दूंगा असे सांगितले. परंतु दरम्यानच्या काळात याप्रकरणातील दिपू हरपाल सिंग यांनी स्वतःचा व अझरुद्दीन मोहम्मद सादिक शेख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सादर करून अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला.शेख मुद्दसीर शेख नसीर हे परत तेथे गेलो असता मेरे को बेल मिल गया, तू पैसे भूल जा, हमारे हात बहुत बहुचे हुए है ठाना और मुंबई पोलीस हमारे जेब मे है अभी कुछ दिन पहले हमारा हमारा ८०/९० लाख  का मला पकडा गया था हमारे साहब ने सब मॅनेज कर दिया तेरा तो सिर्फ चोरी का केस है निकल यहाँ से असे म्हटले सदर  प्रकरणाने मी खुप तनावात असल्याचे शेख मुद्दसीर शेख नसीर यांनी सांगितले असुन त्यांनी व्यतीत होत उपनगर पोलीस ठाणे येथे शेवटचा पर्याय म्हणून सदर केस मध्ये भादवि कलम १७७,२०३,४०६,४०७, ४११,४१८,४२०,४२५,४२७,३४ व इतर योग्य ते कलम लावून गुन्हा नोंद व्हावा व सदरील आरोपींनावर कठोरात कठोर कारवाई व्हावी याकरिता शेख मुद्दसिर शेख नसीर यांनी उपनगर पोलीस ठाणे नाशिक येथे दिनांक १८/०१/२०२३ रोजी गुन्हा नोंद होने कामी तक्रार अर्ज दिला असून सदर गुन्ह्यात पोलिसांनी वाढीव कलम लावलेली असल्याबाबत सांगितले. परंतु शेख मुद्दसीर यांनी दिलेल्या तक्रार अर्जावर अद्यापही कोणतीही कारवाई केलेली नाही सदर प्रकरणातील राघवेंद्र सिंग राहणार पडघा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे,तसेच दिपू हरिपाल सिंग राहणार पडघा भिवंडी ठाणे, मॅनेजर कैलास सपाट राहणार पडघा भिवंडी ठाणे, वाल्मीक माधव इप्परदास, अझरुद्दीन मोहम्मद सादिक शेख अझरुद्दीन मोहम्मद सादिक शेख, यांच्या पत्नी सदर प्रकरणातील संशयित गुन्हेगार यांच्यावर अनेक ठिकाणी सुनियोजित पणे कट कारस्थान करून असे अनेक प्रकारचे गुन्हे करतात असे शेख मुद्दसीर यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. परंतु पोलिसांकडून होणाऱ्या तपासातील दिरंगाईमुळे आरोपींतांना असणाऱ्या राजकीय पाठिंबामुळे ते वारंवार गुन्हे करूनही गुन्हे उघडकीस येऊनही वाचत असून मजल दरमजल त्यांची कायदा मोडण्याची हिंमत वाढत असून माझ्यासारख्या  गरीब लोकांना लुटून कायद्यातील पळवाटांचा वापर करून स्वतःची सुटका करून घेऊन त्यांनी एक प्रकारे कायद्याला आवहाण देण्याचे काम केले असून त्यांच्यावर योग्य अशा उच्चस्तरीय संस्थेमार्फत निपक्षपणे चौकशी होऊन कठोरातील कठोर शासन व्हावे अशा प्रकारचा तक्रार अर्ज उपनगर पोलीस स्टेशन,सहित नाशिक पोलीस आयुक्त, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुंबई पोलीस आयुक्त गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय मुंबई, आदी ठिकाणी देत शेख मुद्दसिर शेख नसीर, यांनी कडक कारवाईची मागणी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला