डांग सेवा मंडळ संचलित ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा,आंबेगण येथे कार्यशाळा

दिंडोरी : डांग सेवा मंडळ संचलित ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा,आंबेगण येथे दि. १४ जून २०२३ रोजी डांग सेवा मंडळ संचलित दादासाहेब बिडकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय पेठ व ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा,आंबेगण यांच्या संयुक्त विद्यमाने नैतिक सक्षमता आणि ज्ञानाचे सौंदर्य व संक्रमण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेचे उद्घाटक डांग सेवा मंडळ संचलित दादासाहेब बिडकर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे माजी. प्राचार्य डॉ.आर.बी.टोचे सर हे होते तर कार्यशाळेच्या अध्यक्ष मा. श्रीमती हेमलताताई बिडकर मॅडम ह्या होत्या.प्रा.श्री.नवनाथ बोंबले व योग शिक्षक मा. श्री. सुनिल अहिरे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले तसेच ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा,आंबेगण चे मा.मुख्याध्यापिका सौ.छाया पाटील मॅडम (प्राथ.विभाग)व मा.मुख्याध्यापक मा. श्री.संदीप कुमावत सर (माध्य .विभाग)आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन झाल्यावर मान्यवरांच्या सत्कार समारंभानतंर लगेचच कार्यशाळेला सुरुवात 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या प्रार्थनेने झाली.योग शिक्षक मा. श्री. सुनिल अहिरे सर यांनी योगासनाचे विविध प्रकार प्रशिक्षणार्थींकडुन करुन घेतले. त्यानंतर नैतिक सक्षमता, सदाचरण यावर प्रा. श्री. नवनाथ बोंबले सर यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर व्हिजन गेम, पेपर शेअरिंग गेम, विशेषण खेळ, सहकारी खेळ असे बौध्दिक व स्मरणशक्तीवर आधारित प्रशिक्षणार्थी साठी मूल्यवर्धित खेळ प्रा. श्रीमती जयश्री निरगुडे मॅडम व प्रा. श्रीमती रचना राऊत मॅडम यांनी घेतले. यानंतर श्रीमती अपर्णा मॅडम,श्री.नितीन सर व बाऱ्हे आश्रम शाखेचे मुख्याध्यापक श्री. अहिरे सर यांनी कार्यशाळेतुन काय शिकता आले याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यशाळेचे उद्घाटक डॉ.आर.बी.टोचे सर यांनी आपल्यातील नैतिक मूल्ये विद्यार्थ्यांना घडविताना त्यांच्यात केला द्वारे, वर्तनाद्वारे रुजवावे ,असे याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानच न देता त्याबरोबर जगायचं कसे हे सुध्दा शिक्षण शिक्षकांनी द्यायला हवे असे मा. श्रीमती हेमलताताई बिडकर मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन व्यक्त केले.या कार्यशाळेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. गोसावी सर यांनी केले. कार्यशाळेला भरघोस प्रतिसाद मिळाला व मोठ्या उत्साहाने नैतिक सक्षमता आणि ज्ञानाचे सौंदर्य व संक्रमण या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला