नोकरीसाठी कुठलाही शॉर्टकट नाही -गणेश न्यायदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदिरानगर

नाशिक - आजचे युग हे स्पर्धेचे आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला इतरांपेक्षा वेगळे करावे लागणार आहे याचा विचार करून प्रयत्न आणि मेहनत घेऊनच यश मिळवता येते याचे भान ठेऊन अभ्यास केला तर यश निश्चित प्राप्त होते. आज नोकरी मिळवायची तर परिक्षेशिवाय पर्याय नसून . असे प्रतिपादन इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश न्हायदे यांनी केले. जाखडी नगर येथील स्वा.वि.दा.सावरकर अभ्यासिका येथे सावरकर जयंती निमित्त अभ्यासिकेतील18 अभ्यासार्थींनी स्पर्धा परिक्षेत यश सपादन केलेल्या विद्यार्थी तसेच परिसरातील 50 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावरअभ्यासिकेचे संस्थापक तथा अध्यक्ष माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे,व्यवस्थापक प्रकाश कुलकर्णी, अँड अमृत फडणवीस आदी उपस्थित होते.गणेश न्हायदे पुढे म्हणाले की, आज कोणीच शिक्षणात परिपुर्ण नाही, दररोज आपण नविन काही शिकत असतो.आज राजकारणची स्थीती पाहीली तर शिक्षण क्षेत्राकडे राजकारण्यांचे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते. परंतू चंद्रकांत खोडे यांनी अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्...