ट्रायबल फोरम कोकण विभागीय अध्यक्षपदी विलास वांगड
पालघर : आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असलेले आप विलास लक्ष्मण वांगड यांची ट्रायबल फोरम कोकण विभागाच्या विभागिय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद घोडाम यांनी केली आहे. ट्रायबल फोरम हे संघटन समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी ,अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन,सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी काम करीत आहे.
वैचारिक व शिस्तबद्ध असलेल्या कँडरबेस ट्रायबल फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध पातळ्यांवर लढा देत आहे. वैचारिक व शिस्त असलेल्या संघटनमध्ये नियुक्ती झाल्यामुळे कोकण विभागात आनंद व्यक्त केला जात आहे.
Comments
Post a Comment