नाशिक मनपाची अस्वच्छता करणा-या २९ जणांविरोधात कारवाई, १५ दिवसांत सुमारे १ लाखांचा दंड वसुल
नाशिक :- (प्रतिनिधी समाधान शिरसाठ) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार शहरात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. सातत्याने मनपाच्या सहाही विभागात कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-यांविरोधातही कारवाई केली जात आहे. दुसरीकडे मनपाकडून प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत जनजागृतीही केली जात आहे. नवीन नाशिक विभागीय कार्यालय अंतर्गत आज दि. ९ मे रोजी प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर केल्याने एका दुकानदाराला पाच हजारांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच रस्ते मार्गावर घाण केल्यामुळे नऊ केसेसमध्ये १,८०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. अशा एकूण १० केसेसमध्ये आज ६,८०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मनपा घनकचरा विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे यांच्या सुचनेनुसार नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत दि.२५.०४.२०२३ ते दि.९.०५.२०२३ या कालावधीत प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर करणे आणि इतर प्रकरणे मिळून एकूण २९ केसेसमध्ये ९४,८०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट टाकल्यामुळे जगताप नगर येथील विघ्नहर्ता क्लिनिकला २५,००० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नवीन नाशिक विभागातील या मोहिमांमध्ये स्वच्छता निरीक्षक आर. डी. मते, रावसाहेब रुपवते, जितेंद्र परमार, विशाल आवारे, राहुल गायकवाड, संतोष गायकवाड तसेच स्वच्छता मुकादम राजाराम गायकर, अजय खळगे, विजय गोगलिया, संग्राम साळवे, विजय जाधव, मिलिंद जगताप, सुनिल राठोड आदी कर्मचारीही सहभागी होते.
*एकूण केसेस आणि दंड*
१) प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर करणे ९ केसेस र.रु.५०,०००/-
२) कचरा वर्गिकरण न करणे ६ केसेस र.रु.३,०००/-
३) सार्वजनिक ठिकाणी थुंकणे २ केस र.रु.२,०००/-
४) रस्ते मार्गावर घाण करणे ९ केसेस र.रु.१,८००/-
५) सार्वजनिक रस्त्यावर सांडपाणी सोडणे १ केस र.रु.५,०००/-
६) सार्वजनिक ठिकाणी बांधकाम राडारोडा टाकणे १ केस र.रु.८,०००/-
७) सार्वजनिक ठिकाणी बायोमेडिकल वेस्ट टाकणे १ केस र.रु.२५,०००/-
एकूण २९ केसेस - र.रु. ९४,८०० दंड
Comments
Post a Comment