नृत्यांगना गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करावा नाशिक जिल्हा बंदी करावी - अंबादास खैरे शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस

गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करा ; युवक राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध
गौतमी पाटीलला जिल्हा बंदी करून तिच्यावर गुन्हा दाखल करा - युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे

नाशिक,दि.१६ मे :- नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील उपस्थित मद्यपी तरुणांनी मारहाण केली. या घटनेत पत्रकार गंभीर जखमी झाले आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत असून गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करून तिला नाशिक जिल्हा बंदी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.

नाशिक मधील. या कार्यक्रमात वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना येथील मद्यपी युवकांनी मारहाण केली. त्यामुळे यामध्ये पत्रकारांना गंभीर दुखापत झाली. या घटनेसाठी सर्वस्वी गौतमी पाटीलला जबाबदार धरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नाशिकमध्ये असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी नाशिक जिल्ह्यात गौतमी पाटीलला पूर्णतः बंदी घालण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी