शनिवारी 20 मे रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

नाशिक, दि. १७ मे २०२३ : मनपाचे मुकणे धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथून ३३ के. की वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे. सदरचे सबस्टेशन मधील विद्युत विषयक कामे करणे करीता विज वितरण कंपनीमार्फत शनिवार दि. २०/०५/२०२३ रोजी वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा करता येणे शक्य होणार नाही. तसेच
 मनपाचे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून मनपाचे शिवाजीनगर, बाराबंगला, पंचवटी, निलगीरीबाग, गांधीनगर, नाशिक रोड या जलशुध्दीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणेत येतो, सदरचे जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभ व वितरण व्यवस्थेतील आवश्यक दुरुस्तीची कामे करणे गरजेचे असल्याने गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.
सबब सदर दोन्हीही ठिकाणाहून होणारा पाणीपुरवठा दि. २०/०५/२०२३ रोजी बंद ठेवून अनु. क्र. १ व २ मधील नमुद दुरुस्ती कामे करता येणे शक्य होणार आहे. तरी मनपाचे मनपाचे गंगापुर धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन व मुकणे धरण पंपींग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा *शनिवार दि. २०/०५/२०२३ रोजीचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच रविवार दि.२१/०५/२०२३ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल* याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे अशी विनंती अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला