महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पुणे ते इंदोर जाणाऱ्या शौर्य यात्रेचे येवल्यात स्वागत
येवला : महाराजा यशवंतराव होळकर यांची पुणे ते इंदोर शौर यात्रा आज सकाळीच कोपरगाव वरून येवल्यामध्ये जोरदार जंगी स्वागत करण्यात आले त्यामध्ये फटाक्यांची आताजबाजी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली तसेच नगर मधून नाशिक जिल्ह्यात प्रवेश करताना जिल्हा बॉर्डरवर स्वागत करण्यात आले व ऐतिहासिक भूमी तात्या टोपे यांच्या स्मारकात जाऊन पुष्पहार गुच्छ अर्पण करून घोषणाबाजी करण्यात आली तसेच ओंकारशाचे वंशज स्वप्निल राजे होळकर,सुधीर भाऊ देडगे, विठ्ठल भाऊ कडू,योगेश धरम, यांचा सत्कार करण्यात आला तसेच लक्ष्मण दिवटे यांनी प्रास्ताविका केली व तदनंतर *महाराजा यशवंतराव होळकर व अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर गणेश भाऊ निंबाळकर यांचे अतिशय धडककेबाज व सुंदर अशी व्याख्यान झाले त्यामध्ये त्यांनी सांगितले की यशवंतरावांचा आणि अहिल्यादेवींचा चांदवड तसेच येवला नाशिक जिल्ह्यासाठी काय योगदान आहे व संपूर्ण भारतासाठी त्यांनी काय काय योगदान दिले व त्यांच्या चरित्रावरती पूर्ण पणे प्रकाश टाकण्यात आला चांदवडच्या रंगमहालाचा काय पलट होण्यासाठी सर्व समाजातील समाज बांधवांनी एकत्र येऊन यापूर्वी महापुरुषांचा इतिहास जागृत ठेवणे आवश्यक आहे हे सांगितले पुणे ते इंदूर जाणारी शौर यात्रा आज या येवला पुण्यनगरीमध्ये दाखल झाली त्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले आणि या महापुरुषांना न्याय मिळालाच पाहिजे यासाठी खोकरशाहीचे वंशज यांनी पुढे येऊन हे राजकीय नाट्य थांबवले पाहिजेत भोसले आणि होळकर यांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राचा इतिहास घडवला पाहिजेत अशी उदगार गणेश निंबाळकर यांनी केले. मच्छिंद्र भाऊ बिडकर यांनी त्यांच्या थोडक्यात चांदवड येथील रंगमालातील माती घेऊन व गोदामाई चे जल घेऊन या महाराजा यशवंतराव होळकर पुतळ्याच्या अनवरणासाठी इंदूर साठी राजांच्या हाती स्वाधीन केले.तसेच स्वप्निल राजे होळकर यांनी सर्व नाशिक जिल्ह्याला येत्या 13 तारखेला होणाऱ्या पुतळ्याच्या अनावरणासाठी निमंत्रण देण्यात आले स्वप्निल राजे होळकर व सुधीर भाऊ देडगे यांनी गणेश भाऊ निंबाळकर यांचा शाल श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी तसेच शौर्यतेच्या ठिकाणी नासिक जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये प्रहार चे जिल्हा चिटणीस समाधान भाऊ बागल येवल्याचे माजी मार्केट कमिटी संचालक गणपतराव कांदळकर, दत्तात्रय वैद्य,दत्तू देवरे, लक्ष्मण दिवटे,प्रहार चे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन किरण चरमळ, हरिभाऊ सोनवणे, नानाभाऊ वाघमोडे, मल्हार महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब सपना, भुषन जाधव सुधीर बागल, ज्ञानेश्वर होलगडे, पप्पू मोरे, श्याम गोसावी, असे अनेक सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.
Comments
Post a Comment