नोकरीसाठी कुठलाही शॉर्टकट नाही -गणेश न्यायदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंदिरानगर
नाशिक - आजचे युग हे स्पर्धेचे आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला इतरांपेक्षा वेगळे करावे लागणार आहे याचा विचार करून प्रयत्न आणि मेहनत घेऊनच यश मिळवता येते याचे भान ठेऊन अभ्यास केला तर यश निश्चित प्राप्त होते. आज नोकरी मिळवायची तर परिक्षेशिवाय पर्याय नसून . असे प्रतिपादन इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश न्हायदे यांनी केले.
जाखडी नगर येथील स्वा.वि.दा.सावरकर अभ्यासिका येथे सावरकर जयंती निमित्त अभ्यासिकेतील18 अभ्यासार्थींनी स्पर्धा परिक्षेत यश सपादन केलेल्या विद्यार्थी तसेच परिसरातील 50 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावरअभ्यासिकेचे संस्थापक तथा अध्यक्ष माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे,व्यवस्थापक प्रकाश कुलकर्णी, अँड अमृत फडणवीस आदी उपस्थित होते.गणेश न्हायदे पुढे म्हणाले की, आज कोणीच शिक्षणात परिपुर्ण नाही, दररोज आपण नविन काही शिकत असतो.आज राजकारणची स्थीती पाहीली तर शिक्षण क्षेत्राकडे राजकारण्यांचे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते. परंतू चंद्रकांत खोडे यांनी अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रात्साहित केले आहे. त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. काम मोठे अथवा छोटे नसते ते मनापासून करणे गरजेचे असते.असेही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गणेश न्हायदे म्हणाले, प्रयत्न व मेहनतीने यश मिळते हे जरी खरे असले तर मिळालेले यश टिकविणे देखिल महत्वाचे असते. अभ्यास करताना आपण स्वत:ला त्यात झोकून देऊन अभ्यास करणे गरजेचे असते. आपण एखादा सिनेमा बघितला तर तो आपण पुर्णपणे लक्षात ठेवतो. त्याचप्रमाणे अभ्यास करताना सिनेमा प्रमाणे करणे गरजेचे आहे. अभ्यास करताना तन,मन अर्पण केले तर तो चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. स्पर्धा परिक्षेचा अभ्यात करताना आपले काय चुकत आहे याचे आकलन करणे महत्वाचे आहे. त्याच प्रमाणे आपल्याला मिळणार असलेल्या परिक्षेच्या वेळेचे नियोजन योग्य प्रकारे होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका तयार करून त्या सोडविल्या पाहिजेत जेणे करून आपला अभ्यास किती झाला आहे. प्रश्न सोडविताना किती वेळ लागला याचा अंदाज तुम्हाला येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका साेडवण्याचा सराव करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आज सायबर क्राईम, रहदारीचे नियम न पाळणे, ऑनलाईन फ्रॉड, मुली पळून जाणे याबाबत त्यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करतान या मागची कारणे काय हे समजाऊन सांगितले.
यावेळी न्हायदे यांच्या हस्ते स्पर्धा परिक्षेत यश मिळविलेल्या नेत्रदीप जोशी (सीए), सुचिता डावखरे, (अधीक्षक आदिवासी विभाग भवन, पेठ),महावीर मिटगणे (जीएसटी अधीकारी), राहूल जाधव (मुख्याधिकारी नगर परिषद) आदिचा प्रातनिधीक स्वरूपात सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रकाश कुलकर्णी, अवधुत कुलकर्णी,अरुण मुनशेटीवार,नंदू विसपुते ॲड.गुंजाळ,ॲड.राहुल काश्मिरे,गौरव वाघ,चैतन्य कुंटे, कैलास बीसी,सारथी खोडे, तसेच जेष्ठनागरिक, विद्यार्थी,पदाधिकारीआदी उपस्थित होते,संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत खोडे यांनी प्रास्तावीक केले.सचिव संकेत खोडे यांनी आभार मानले.स्वागत प्रदीप जगताप यांनी केले.
Comments
Post a Comment