वृद्ध महिलेसह मुलास मारहाण प्रकरणी येवला तालुका पोलीसात गुन्हा दाखल
येवला : पोलीसांनी दिलेली माहिती अशी की अंगुलगाव येथील रहिवासी जिजाबाई गणपत झाल्टे ह्या घराजवळच मागच्या बाजूला जिजाबाई गेल्या असता कुरापत काढून रविंद्र अर्जुन झाल्टे यांने जिजाबाई यांना लाथ मारल्याने त्या खाली पडल्या त्यात त्यांना डोक्याच्या पाठीमागील बाजूस दगडाने दुखापत झाली त्यानंतर शैलेंद्र अर्जुन झाल्टे, तसेच अजुन दोन अशांनी जिजाबाई यांना तसेच त्यांचा मुलगा सुदेश याला मारहाण केली धमकी दिली की आमच्या नादाला लागू नका नाहीतर तुम्हाला संपवून टाकू अशी दमबाजी केली म्हणून जिजाबाई गणपत झाल्टे, यांनी येवला तालुका पोलीसात गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी पोलीस हवालदार हेंबाडे तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment