ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या 'नांदगाव ते लंडन' व 'उजेड पेरायचा आहे' या पुस्तकाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन

कदम कुटुंबीयांची फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची पताका घेऊन वाटचाल याचा विशेष आनंद - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या पुस्तकांतून सामाजिक विचारांची मांडणी - छगन भुजबळ

नाशिक :-  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराजा सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव पाटील, साने गुरुजी  यांच्या विचारांची पताका खांद्यावर घेवून कदम कुटुंब वाटचाल करीत आहेत. या सामाजिक विचारांची मांडणी ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांनी त्यांच्या पुस्तकातून मांडली आहे,असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले. नाशिकच्या मु.श.औरंगाबादकर सभागृहात नांदगावचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या 'नांदगाव ते लंडन' व 'उजेड पेरायचा आहे' या पुस्तकाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयोजित सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ कवी फ.मु.शिंदे, त्यांच्या पत्नी साहित्यिका प्रा. लीलाताई शिंदे, माजी आमदार पंकज भुजबळ, अनिल आहेर,जगन्नाथ धात्रक,नानासाहेब बोरस्ते, मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, बापुसाहेब कवडे, प्रा.अर्जुन कोकाटे, प्रा.शंकर बोराडे, वसंत खैरनार, रमेश कदम, ग्रंथालीचे सुदेश हिंगलाजपुरकर,पत्रकार गौतम संचेती, संदीप देशपांडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व कदम कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमर शेख यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे. त्यांच्याशी कदम कुटुंबीयांचा त्यांच्याशी कायम स्नेह राहिला. कदम कुटुंब राष्ट्रसेवा दल, सामाजिक चळवळीत तून पुढे आल्याने महात्मा फुले, छत्रपती शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा कदम कुटुंबियांवर राहिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, भास्कर कदम यांच्या लंडन प्रवासाचा वर्णनाचा धागा पकडून परदेशात निर्माण झालेल्या सुविधांचा अभ्यास करून देशातील शहरांचा विकास करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. देशात अनेक ऐतिहासिक वास्तू आहे. त्यांचं संवर्धन करून जगासमोर मांडण्याची आवश्यकता आहे. परदेशात ज्या ऐतेहासिक वास्तू त्या वास्तूंची तेथील नागरिकांनी त्याचे जतन करून ठेवले आहे. पर्यटनासाठी त्याचा उपयोग करून त्यावर अर्थकारण सुरू आहे. आपल्याकडे देखील याचा विचार होण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितलं आहे "वाचाल तर वाचाल". त्यामुळे पुस्तक ही वाचली पाहिजे. पुस्तकातून व्यक्तिमत्त्व घडत असते असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, राष्ट्र सेवा दल, युवक बिरादरी, समर्पित अभियान, समता मंच, तसेच विविध सामाजिक संस्था पदाधिकारी म्हणून कदम यांनी वाटचाल करत आहे. त्यांच्या साहित्यातून ही सामाजिक जाणीव दिसते असते त्यांनी यावेळी सांगितले. 

मुंबई ते नाशिक राजधानीचा प्रवास

कार्यक्रम प्रसंगी ते म्हणाले की, आपण नाशिक ते मुंबई फोर लेन विकसित केला आहे. मात्र आता सद्या सरकारची कृपा असल्याने रस्त्याची दुरवस्था आहे. त्यामुळे आज ट्रेन ने प्रवास करावा लागला अशी मिश्किल टीपणी त्यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला