कर्तुत्ववान नेतृत्व हेमलताताई बिडकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
आंबेगण : जनसेवेचावसा घेत शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य सेवेची बांधलकी जोपासत 'साधी राहणी उच्च विचारसरणी हे तत्व अंगीकारत कर्तुत्वाच्या बळावर जनमानसात आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या डांगसेवा मंडळाच्या अध्यक्षा म्हणजेच हेमलता विजय बिडकर. काही माणसं कर्तुत्वाने श्रीमंत असता आणि त्यांच्या कर्तुत्वाचा नेतृत्वाचा अभिमान हा जनसामान्यांनाही असतो. समाजाच्या सर्वच घटकांसाठी तळमळीने काम करीत असतांना कुठलाही मोठेपणा न बाळगता जनसामान्यात समरस होवून आपुलकी, आस्था, प्रेम आणि जिव्हाळा जोपासून आपल्यातील दातृत्व सिद्ध करणारी माणस खुप कमी असतात. अशी माणस ही समाजासाठी प्रेरक आणि नेतृत्वाची खरी गरज असतात. अशाच नाशिक जिल्ह्यात आदिवासी भागातील कळवण, सटाणा, सुरगाणा, पेठ, दिंडोरी तालुक्यातील भूमित लाभलेल्या अशाच सर्व समावेशक आणि लोकप्रिय नेतृत्व म्हणजे मा. हेमलता बिडकर आज त्यांच्या ७५ वा वाढदिवसा निमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाशझोत.
घरातच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्याचा वारसा लाभलेला असतांनाही स्वत:चे कर्तुत्व आणि हिंमतीने विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे नाशिक येथील डांगसेवा मंडळाच्या अध्यक्षा मा. हेमलताताई बिडकर यांनी अपार मेहनत आणि अफाट कर्तुत्वाच्या बळावर घतलेली भरारी कौतुकास्पद आहे.
आदिवासी दुर्गम भागात स्वातंत्र्य पुर्व काळात २३ जून १९३७ साली थोर स्वातंत्र्य सेनानी दलित मित्र कर्मवीर दादासाहेब बिडकर यांनी स्थापन केलेलो पहिली शैक्षणिक संस्था म्हणजे डांगसेवा मंडळ.
स्वातंत्र्यपुर्व काळामध्ये सटाणा, कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी या दुर्गम भागातील आदिवासी समाज हा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रापासून दुरावलेला होता. सर्व शासनाच्या सोयी सुविधा नसल्याने शैक्षणिक सुविधांपासून दूर होता. म्हणुन आदिवासी समाजाला शैक्षणिक प्रभावात आणण्याचे कार्य महत्वाचे आहे हे लक्षात घेवून कर्मवीर दादासाहेब बिडकर यांनी आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी डांगसेवा मंडळाची स्थापना करून महाराष्ट्रातील पहिली आश्रमशाळा उंबरठाण, ता. सुरगाणा येथे सुरू केल्यानंतर मुल्हेर, अभोणा, पेठ, बान्हे, ओतुर, उंबरठाण, कुकुडणे, आंबेगण, सुळे, धांद्रीपाडा, वारे, शिंदे (दि) येथे शाळा सुरू केल्या.
अशा या शैक्षणिक संस्थेचे कार्य आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. या रूपांतरात कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या निधनानंतर स्वर्गीय डॉ. विजयजी बिडकर यांनी आरोग्याबरोबर ,शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरारी घेवून दादांचे कार्य पुढे चालविण्याचे ठरविले. डॉक्टर साहेबांच्या कार्यकाळात आश्रम शाळा व माध्यमिक आश्रमशाळेचा खुपच मोठा कायापालट झाला. डॉक्टर साहेबांनी पेठ सारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात दवाखाना सुरू केला होता. पेठ परिसरातील डॉक्टर साहेब म्हणजे देवमाणूस म्हणुन प्रसिद्ध होत.
स्वर्गीय डॉ. विजयजी बिडकर यांच्या निधनानंतर विद्यमान अध्यक्षा हेमलताताई विजय बिडकर यांनी संस्थेची धुरा सांभाळली. आज संस्थेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेची पताका उंचच उंच वाढत आहे. मा. ताईसाहेब यांनी कर्मवीर दादासाहेब बिडकर व स्वर्गीय डॉ. विजयजी बिडकर यांचे स्वप्न पुर्ण करण्याचे ठरविले असून ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्यांना उपाध्यक्ष - दामु काका ठाकरे व सचिव सौ. मृणालताई जोशी व संचालक मंडळाची चांगली साथ देत आहेत.
संस्थेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल
महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार नाशिक भुषण पुरस्कार सारडा प्रतिष्ठाण चा नंदिणी पुरस्कार आदिवासी सेवक पुरस्कार उत्कृष्ट संस्था पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार, इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार अशा विविध व वैशिष्ट्यपूर्ण पुरस्कारांनी सन्मानित झालल्या संस्थेला नुकताच पुणे विद्यापिठाचा अत्यंत मानाचा समजला जाणारा 'सावित्रीबाई फुले सन्मान २०२३ ' हा पुरस्कार मा. हेमलताताई बिडकर यांना जाहीर झाला आहे. ताईसाहेब कित्येक वर्षापासून उत्साहाने समाज सेवेचे कार्य करत असतांनाच शैक्षणिक कार्याबरोबरच महिला सबलीकरण क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
सुळे व आंबेगण आश्रम शाळेत शैक्षणिक सुविधा बरोबरच, संगणक प्रशिक्षण शिवण क्लास, इलेक्ट्रीशीयन मोबाईल रिपेअरींग असे कोर्सेस सुरू केले असून पेठ येथील महाविद्यालयात लिफाफे, सॅनिटरी नॅपकीन, फाईल तयार करण्याचे प्रशिक्षण देवून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या काळातही मा. ताईसाहेबांनी आदिवासी दुर्गम भागात जनजागृती करून हजारोंच्या संख्येने मोफत मास्क वाटप केले आहे. त्याचबरोबर गामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे सोयी सुविधा मिळतील यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात.
Comments
Post a Comment