व्यंकटेश को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मार्फत शिवाजी डोळे यांच्या प्रयत्नातून प्रथमच शेळी मेंढी नाशिक ते दुबई एक्सपोर्ट


नाशिक :- नाशिक जिल्ह्यात व्यंकटेश को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मार्फत  शिवाजी डोळे यांच्या प्रयत्नातून  प्रथमच शेळी मेंढी पालन नाशिक ते दुबई एक्सपोर्ट करण्यात आले. सकाळी ओझर विमानतळावरनं 1000 शेळी दुबई साठी रवाना झाली. अजूनही 30 हजार शेळी मेंढीची  मागणी आहे. त्यामुळे हा व्यवसाय शेती पूरक असल्याकारणाने सर्व मेंढपाळ बांधवांना या व्यवसायात मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि यापुढे मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करण्यावर भर देण्यात येईल असे व्यंकटेश को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मार्फत सांगण्यात आले आहे. यावेळी शेळी मेंढी पालन करणारे मेंढपाळ बांधव  तसेच सामाजिक कार्यकर्ते ओझर विमानतळावर याप्रसंगी दाखल होते. खासदार विकास महात्मे, शिवाजीराव डोळे, विनायक काळदाते, प्रहार जिल्हा सरचिटणीस  समाधान बागल, मा. तहसीलदार कुवर साहेब, विवेकानंद वाघ, ज्ञानेश्वर ढेपले अण्णासाहेब सपनार, वैभव रोकडे, भूषण जाधव, संदेश मोरे, निंबा जाधव, ज्ञानेश्वर परदेशी, बापू शिंदे,मेंढपाळ बांधव, व्यंकटेश को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सदस्य वर्ग,  तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन