कुंभमेळ्याच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्वाचा - मंत्री गिरीश महाजन
कुंभमेळ्याच्या यशस्वितेसाठी लोकसहभाग महत्वाचा - मंत्री गिरीश महाजन नाशिक येथे कुंभमेळा प्राधिकरणातर्फे ‘कुंभ मंथन’; कुंभ मंथनातील सूचनांचा नियोजनात अंतर्भाव करणार नाशिक, दि. २१ : सिंहस्थ कुंभमेळा हा सर्वांचा आहे. तो स्वच्छ, सुरक्षित, हरित आणि यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. कुंभ मंथनातून प्राप्त सूचनांचा नियोजनात अंतर्भाव करण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आज पंडित पलुस्कर सभागृह (इंद्रकुंड, पंचवटी, नाशिक) येथे कुंभ मंथन लोकसहभागातून यशस्वी कुंभमेळ्याकडे हा कार्यक्रम झाला,यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार राहुल ढिकले,आमदार मंगेश चव्हाण,नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम,नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, कुंभमेळा आयुक्त करिश्मा नायर,पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण,आदी उपस्थित होते.मंत्...