Posts

राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार - महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

Image
मुंबई,दि.८ :- परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पहिले सर्वेक्षण पूर्ण केले असून जिल्ह्यातील एकल महिलांचे प्रमाण पाहून राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले. राज्यमंत्री बोर्डीकर यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घालून, परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पहिले सर्वेक्षण पूर्ण केले आहे. नगरपंचायत, नगरपालिका व महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम,राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास, बचत गटांचे सशक्तीकरण, गृहउद्योग प्रोत्साहन, आरोग्य व निवारा सुविधा यांसारखे कार्यक्रम राबवले जातील. यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सीआरएस भागीदार यांच्यामार्फत एकात्मिक धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.तालुका व जिल्हा स्तरावर कृतीगट स्थापन करण्यात येणार ६० वर्षांवरील महिलांसाठी वृद्धापकाळातील योजनांचा अभाव लक्षात घेता त्यांना आरोग्य, सुरक्षितता व उदरनिर्वाहासाठी नवे उपक्रम राबवले ...

बागलाण तालुक्यातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आ.दिलीप बोरसे यांना निवेदन

Image
बागलाण :- तालुक्यातील आरोग्य विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मतदारसंघाचे आ.दिलीप बोरसे, यांना मागण्यांचे निवेदन दिले.राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कर्मचारी यांचे नियमित शासन समायोजन करणे बाबत मुख्य मागणी करण्यात आली आहे. होत असलेल्या विलंबाबाबत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी १९/०८/२०२५ आंदोलन करत आहे. यामुळे संपूर्ण महाराष्टात आरोग्य सेवा मोठया प्रमाणात प्रभावीत झालेली आहे.शासनाने लवकरात लवकर आंदोलनाची दखल घ्यावी याबाबत आ.दिलीप बोरसे यांना निवेदन देवुन शासन दरबारी न्याय मिळवून देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी आमदार बोरसे यांच्याकडे केली आहे.याबाबत आरोग्य मंत्री आबिटकर,यांची भेट घेऊन कंत्राटी कर्मचारी यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी दिले.याप्रसंगी कत्रांटी कर्मचारी किरण भामरे,मोराणकर साहेब, राहुल पवार,देवा हिरे,आरोग्य सेविका क्षमा शिरशैट्टी, वैशाली शिरोळे,रत्ना देवरे,रुपाली वाघ,निर्मला सोनजे, भारती शिंदे,पुनम पवार, सोनाली वाघ,मनाली हिरे,सिमा गावीत,माधुरी आहेर,धनश्री नवरे,भाग्यश्री गाड...

गणरायाच्या विसर्जन जल्लोषात गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांचा गणरायाला रोप

Image
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे, त्या उत्सवाचा जल्लोष आज गिरगाव चौपाटीवर उच्चांक गाठताना दिसला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून गणरायाला निरोप दिला.राज्य महोत्सवाच्या या उत्साहात गीरगाव चौपाटीवर विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार अमित साटम, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अमितकुमार सैनी तसेच हजारो भाविक यांची उपस्थिती होती. ढोल-ताशांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या गजरात वातावरण भारावून गेले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला.राज्यात दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. “लोकांनी हा उत्सव मोठ्या जल्लोषात सा...

कुंभार समाज विद्यार्थी गुणगौरव समाज भूषण पुरस्कार समारंभ मेळावा संपन्न

Image
नासिक :- दि.५. कुंभार स.सामा.सं.महाराष्ट्र प्रदेश संलग्न नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीच्या वतीने (सालाबाद प्रमाणे) विद्यार्थी गुणगौरव ,समाज भूषण संतसेवा, आदर्श माता - पिता, पुरस्कार समारंभ शुक्रवार दि.५/९/२०२५, श्री लक्ष्मी बॅकवेट हॉल. पंचवटी. नाशिक. येथे, ,मोठ्या उत्साही आनंदी,वातावरणात संपन्न झाला.यावेळी प्रमुख मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या मूर्तीचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश दादा दरेकर, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ,आ. देवयानीताई फरांदे,आ. सरोजताई अहिरे,तसेच,नाशिक जि.वि.समितीचे संस्थापक अध्यक्ष, कुंभार.स.सा.सं.म.प्र.चे, प्रदेश अध्यक्ष रमाकांत क्षीरसागर,नाशिक जिल्हा अध्यक्ष सोमनाथ सोनवणे अभोना,सोमनाथ सोनवणे दिंडोरी,अशोक सोनवणे, संजय रुईकर,डॉ दिलीप मेणकर,शरद आहेर, संजय जोरले, अरुण नेवासकर,शहराध्यक्ष गणेश आहेर,ज्ञानेश्वर जठार,समाधान सोमासे, विजय रसाळ,तसेच नाशिक जिल्हा तसेच राज्याच्या विविध भागातून आलेले विशेष निमंत्रित समाजबांधव मान्यवर पदाधिकारी व्यास...

खा.भास्कर भगरे यांच्या हस्ते कुंभार समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

Image
नाशिक :- नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यास खा.भास्कर भगरे यांची उपस्थिती समाजाच्या वतीने मान्यवरांचा गौरव समारंभ,विद्यार्थी गुणगौरव,सेवा निवृत्त कर्मचारी सत्कार सोहळा संपन्न.यावेळी दिंडोरी लोकसभा खासदार भास्कर भगरे,यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी समाजाचे प्रदेशाध्यक्ष रमाकांत क्षीरसागर,जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे,रमेश गायकवाड,शाम जोंधळे,अशोक जाधव,राजेंद्र रोकडे, गणेश आहेर,नंदू सोनवणे,विट उत्पादक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय चव्हाण, (अभोणा) मान्यवर उपस्थित होते.मेळाव्याचे आयोजन नाशिक जिल्हा कुंभार समाज जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे,यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली करण्यात आले.याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील मान्यवर सत्कारमूर्ती,महिलांसह कुंभार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभोणा येथील एकलव्य गणपती मंडळाच्या गणरायाचे जल्लोषात विसर्जन

Image
कळवण :- अभोणा येथील एमबीआय एकलव्य गणपती मंडळ,शास्त्रीनगर अभोणा येथील गणरायाचे जल्लोषात विसर्जन मिरवणूक प्रसंगी अभोना पोलीस स्टेशनचे एपीआय पाटोळे सर,कोकाटे मॅडम,मीराबाई पवार,मा.सरपंच सदस्य.गणेश मंडळाचे अध्यक्ष किशोर पाटील,पदाधिकारी मनोज वेधणे, गंगा जाधव,राजेंद्र तायडे, राकेश कुमावत, शंकर पवार, भैया हिरे,अनिल गोडस्वार,हिम्मत पवार,महेश चव्हाण,गणेश राजभोज, आदींसह,मोठ्या संख्येने कार्यकर्ते,गणेश भक्त,अभोणा ग्रामस्थ,उपस्थित होते.शशिकांत गिरणेवाले यांच्या वतीने गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

समाज व विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षक करत असतात - अँड.नितीन ठाकरे

Image
नाशिक :- प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शक म्हणून आई-वडील, गुरु व शिक्षक यांचे मोलाचे स्थान असते. शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत विद्यार्थ्याचे शैक्षणिक तसेच बौद्धिक घडण शिक्षकांमार्फत होत असते. यातूनच समाज व विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करतात, असे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस अँड.नितीन ठाकरे यांनी केले.के.टी.एच.एम. महाविद्यालयात आयोजित शिक्षक दिन व विद्यार्थी गुणगौरव समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी डॉ. कैलास शिंदे, प्राचार्या डॉ. कल्पना अहिरे, उपप्राचार्य डॉ. एन. डी. गायकवाड, डॉ. वसंत बोरस्ते, प्रा. किरण रेडगावकर व प्रा. गावले उपस्थित होते. अँड.नितीन ठाकरे पुढे म्हणाले, “मविप्र संस्थेची १११ वर्षांपासून अविरत वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या कर्मवीर, देणगीदार यांच्याइतकाच जुन्या काळातील शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. वर्गखोल्या, इमारत नसतानाही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. सध्या नव्या शैक्षणिक धोरणामुळे संशोधन व नावीन्यतेला महत्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान देण्यासाठी शिक्षकांनी स्वतःमध्येही बदल घडवणे...