राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार - महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर
मुंबई,दि.८ :- परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पहिले सर्वेक्षण पूर्ण केले असून जिल्ह्यातील एकल महिलांचे प्रमाण पाहून राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले. राज्यमंत्री बोर्डीकर यांनी या गंभीर प्रश्नात लक्ष घालून, परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर पहिले सर्वेक्षण पूर्ण केले आहे. नगरपंचायत, नगरपालिका व महापालिका क्षेत्रातील सर्वेक्षण लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम,राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास, बचत गटांचे सशक्तीकरण, गृहउद्योग प्रोत्साहन, आरोग्य व निवारा सुविधा यांसारखे कार्यक्रम राबवले जातील. यासाठी शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सीआरएस भागीदार यांच्यामार्फत एकात्मिक धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.तालुका व जिल्हा स्तरावर कृतीगट स्थापन करण्यात येणार ६० वर्षांवरील महिलांसाठी वृद्धापकाळातील योजनांचा अभाव लक्षात घेता त्यांना आरोग्य, सुरक्षितता व उदरनिर्वाहासाठी नवे उपक्रम राबवले ...