न्यू मराठा हायस्कूलमध्ये मालोजीकाका मोगल यांना अभिवादन
नाशिक : न्यू मराठा हायस्कूलमध्ये सहकारमहर्षी मालोजी काका मोगल यांना अभिवादन करताना उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी
नाशिक :- मविप्र संचलित न्यू मराठा हायस्कूलमध्ये सहकारमहर्षी मालोजीकाका मोगल यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर कोतवाल होते. कार्यक्रमाची सुरुवात मालोजीकाका मोगल यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली. त्यानंतर इयत्ता ९ वी अ वर्गातील देवश्री चौधरी, श्रेया थोरात या विद्यार्थ्यांनी मालोजी काका मोगल यांचा जीवनपरिचय तर शिक्षक मनोगतातून आरती पवार यांनी त्यांच्या मविप्र संस्थेच्या कार्याची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात ज्ञानेश्वर कोतवाल यांनी मालोजी काका मोगल यांचे निफाड तालुक्यातील सामाजिक कार्य विषद केले. १९४२ मधील इंग्रजांविरोधातील चलेजाव चळवळ भरास आली होती. त्यावेळी शिवाजी मराठा बोर्डिंगमधील विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकाविला. त्यामुळे त्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. मालोजी काकांना वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत अनेक पदांवर कार्यरत असतानाचे त्यांचे शैक्षणिक योगदान सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. रुतिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अनुजा तिडके हिने आभार मानले.
Comments
Post a Comment