आश्रमशाळा आंबेगण दिंडोरी येथील प्रयोगशाळा परिचर कैलास कुवर यांचा सेवापूर्ती समारंभ


आंबेगण वार्ताहर :- डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेच्या ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण ता दिंडोरी येथील प्रयोगशाळा परिचर कैलास त्र्यंबक कुवर यांचा सेवापूर्ती समारंभ दि.११/०७/२०२४ गुरुवार रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे लेखापाल पियुष पारेख, तसेच संस्थेच्या सर्व आश्रमशाळा व विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा हेमलता बिडकर, यांनी सेवापूर्ती समारंभाचे सत्कारमूर्ती कैलास कुवर, यांचा सपत्नीक सत्कार केला. तसेच ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण या शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार केला.आपल्या मनोगतात माध्यमिक शिक्षक भानुदास गोसावी यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. तर आश्रमशाळा आंबेगण येथील माध्यमिक मुख्याध्यापक संदीप कुमावत, यांनी त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. डॉ विजय बिडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पेठ येथील प्राचार्य राजेंद्र पाटील यांनी कैलास कुवर, यांच्या आठवणींना उजाळा दिला.


तसेच आश्रमशाळा धांद्रीपाडा येथील मुख्याध्यापक चंद्रशेखर अहिरराव यांनी त्यांच्या जीवनाचा प्रवास सांगितला. कैलास कुवर हे शालेय कर्तव्य निभावून फलक लेखन, सुतार काम, शाळेच्या कार्यक्रमाचे वृत्तांकन कसं उत्कृष्ट सांभाळत याची माहिती पंडित जवाहरलाल नेहरू आश्रमशाळा कुकुडणे येथील मुख्याध्यापक रमेश जाधव, यांनी सांगितली.कैलास कुवर यांनी त्यांच्या कार्यकाळात संस्थेच्या सर्व शाळा सुशोभीकरण करण्यात मोलाची भर घातली. तसेच एकलव्य सोसायटीच्या चेअरमन पदाची धुरा सुद्धा त्यांनी काही काळ सांभाळली. आपल्या सेवापूर्ती निमित्ताने त्यांनी आश्रमशाळा आंबेगण येथील सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजनाची मेजवानी दिली.या कार्यक्रमासाठी आश्रमशाळा सुळे येथील मुख्याध्यापक प्रशांत जाधव, आश्रमशाळा उंबरठाण येथील मुख्याध्यापक धनराज सोनवणे, आश्रमशाळा वारे येथील मुख्याध्यापक महेन्द्र शिंदे, आश्रमशाळा शिंदे ( दि ) येथील मुख्याध्यापक विवेक राठोड, जनता विद्यालय मुल्हेर येथील मुख्याध्यापक अशोक नंदन, जनता विद्यालय ओतूर येथील मुख्याध्यापक उल्हास रुपवते, जनता विद्यालय बार्हे येथील मुख्याध्यापिका श्रीमती पवार, जनता विद्यालय अभोणा येथील मुख्याध्यापक पी. एस. अहिरे,यांनी देखील त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार केला.सत्कारमूर्ती कैलास कुवर,यांच्या समवेत त्यांच्या कुटुंबातून सुबोध कैलास कुवर, शालिनी देवरे,सपना कैलास कुवर व इतर मंडळी उपस्थित होते.आपल्या मनोगतात कार्यक्रमाच्या अध्यक्ष हेमलता बिडकर, यांनी कैलास कुवर, यांना भविष्यातील वाटचाल सुखद व आरोग्य संपन्न जाओ ही सदिच्छा व्यक्त केली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक मुख्याध्यापक राजेंद्र अहिरे , माध्यमिक मुख्याध्यापक संदीप कुमावत, सुधीर जगदाळे, हेमंत भामरे, अपर्णा गणाचार्य, तुसेसर, तुषार ह्याळीज, प्रशांत थोरात,सौ.सावंत, श्रीमती निकुंभ, श्रीम पवार, श्रीम ठाकरे, भाऊसाहेब पगार, जगदीश केदारे, वसंत डोंगरे, गणेश गवळी, सतिष राऊत, कमलेश सातपुते व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला