आश्रमशाळा आंबेगण येथे गुरुपौर्णिमेनिमित्त तरुपुत्र महोत्सव वृक्षारोपण उत्साहात संपन्न

दिंडोरी आंबेगण :- दि. २१ जुलै २०२४ रविवारी ठक्कर बाप्पा आश्रमशाळा आंबेगण येथे डांग सेवा मंडळ व गायत्री परिवार युग निर्माण ट्रस्ट नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त तरुपुत्र महोत्सव ( वृक्षारोपण) व पंचकोटी यज्ञ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता ताई बिडकर, गायत्री युग निर्माण ट्रस्ट नाशिक येथील अमृतभाई पटेल, जयंतीभाई नाई,मीनानाथ सोनवणे,जयगोविंद पांडे, तसेच असंख्य भक्त परिवार उपस्थित होता.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना, प्रज्ञागीत याद्वारे झाली. त्यानंतर श्वेताली राणे यांनी जीवनातील गुरुंचे महत्त्व सांगितलं.नंतर डांग सेवा मंडळातील शिक्षकांनी गुरुमहिमा आपल्या सुंदर गीताद्वारे सादर केली.गायत्री युग निर्माण ट्रस्ट तर्फे आयोजित भारतीय संस्कृती ज्ञान परीक्षा यशस्वीतेसाठी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता ताई बिडकर, आश्रमशाळा आंबेगण, वारे, शिंदे, उंबरठाण, कुकुडणे, धांद्रीपाडा, सुळे तसेच पेठ, बार्हे, ओतूर, अभोणा, मुल्हेर येथील विद्यालय व अनुदानित आश्रमशाळा मनखेड,जय योगेश्वर माध्यमिक विद्यालय ठाणगाव येथील मुख्याध्यापक व शिक्षक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.तसेचआश्रमशाळा आंबेगण येथील पालक व विद्यार्थी यांच्यासोबत पंचकोटी यज्ञाची पुजा करण्यात आली. त्यानंतर विधिवत तरुपुत्र पुजन करून वृक्षारोपण करण्यात आले. शाळेच्या भव्य आवारात गुरुपौर्णिमेनिमित्त ५०० फळ, फुले व आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवर, पालक व विद्यार्थी यांना मिष्ठान्न भोजनाचा प्रसाद देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास गोसावी, केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक मुख्याध्यापक  राजेंद्र अहिरे, माध्यमिक मुख्याध्यापक संदीप कुमावत, सुधीर जगदाळे, हेमंत भामरे, अपर्णा गणाचार्य, भाऊसाहेब पगार, जगदीश केदारे, तुषार ह्याळीज, प्रशांत थोरात, सौ.सावंत, निकुंभ, श्रीम पवार, श्रीम ठाकरे, वसंत डोंगरे, सतिष राऊत, गणेश गवळी, कमलेश सातपुते व शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगदान दिले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला