मखमलाबाद विद्यालयात गुरुशिष्य पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी
फोटो - गुरुशिष्य पुण्यतिथी निमित्त कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांचे प्रतिमापुजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांची गुरुशिष्य पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रतिमापुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी व्यासपिठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे,व जेष्ठ शिक्षकवृंद उपस्थित होते.कु.प्रिया शिंदे, हिने कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या जीवनकार्याविषयी सखोल माहिती दिली.कु.अनुजा जाधव हिने सहकार महर्षी माधवराव बोरस्ते यांच्या जीवनकार्याविषयी सखोल माहिती दिली.प्राचार्य संजय डेर्ले यांनी आपल्या मनोगतात गुरु शिष्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.कर्मवीर काकासाहेब वाघ व सहकार महर्षी माधवराव बोरस्ते या गुरुशिष्यांचे निफाड तालुका व नाशिक जिल्ह्यात मोठे कार्य होते.त्यांनी सहकार,राजकिय,शैक्षणिक व सामाजिक कार्यांमध्ये मोठे योगदान दिलेले आहेत.मविप्र संस्थेच्या प्रगतीत त्यांचा फार मोठा हातभार आहे.अशा या गुरुशिष्यांच्या स्मृती जागृत रहाव्या व नविन पिढीस त्यांच्या कार्याची माहिती या निमित्ताने होत असते असेही त्यांनी शेवटी सांगितले.सुत्रसंचालन कु.अक्षरा मुर्तडक, हिने केले.या ८ वी फ च्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका अश्विनी टर्ले, यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment