निपमची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

निपमच्या अध्यक्षपदी  राजाराम कासार  तर मानद चिटणीस पदी प्रकाश गुंजाळ सह चिटणीस पदी राजेंद्र आचारी   

नाशिक :- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट ( निपम) ची ४३ वी वार्षिक सभा जी. पी. फार्म च्या सभागृहात उत्साहाने पार पडली. या सभेत निपम च्या अध्यक्षपदी राजाराम कासार यांची तर उपाध्यक्षपदी विनायक पाटील व राहुल बोरसे यांची निवड करण्यात आली मानद चिटणीस म्हणून प्रकाश गुंजाळ तर सहचिटणीस म्हणून राजेंद्र आचारी खजिनदार म्हणून  सुस्मित दळवी यांची निवड करण्यात आली कार्यकारणी सदस्य म्हणून मनोज मुळे, गोविंद बोरसे, तुषार मोईम , श्रीकांत पाटील व विनेश मोरे यांची निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध झाली असून निवडणूक अधिकारी म्हणून निपमचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट एस एस खैरनार यांनी काम पाहिले. अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर आपण नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी नाशिकच्या औद्योगिक पट्ट्यात नवीन नवीन उद्योग आणण्यासाठी काम करू तसेच नाशिकच्या मनुष्यबळ विकास क्षेत्राच्या विकासासाठी काम करू असे प्रतिपादन राजाराम कासार यांनी केले.                              
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निपम चे माजी अध्यक्ष डॉक्टर उदय खरोटे होते व्यासपीठावर निवडणूक अधिकारी एडवोकेट एस एस एन खैरनार  हेमंत राख, राजाराम कासार, विनायक पाटील, प्रकाश गुंजाळ राजेंद्र आचारी, जयंत ओझरकर, सुस्मित दळवी, श्रीकांत पाटील, मनोज मुळे,गोविंद बोरसे व विनेश मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मावळत्या कार्य करण्याचे सरचिटणीस हेमंत राख यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले व त्यांनी वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा सादर केला त्यात मुख्यत्वे ह्यूमन राइट्स संदर्भातील जागरूकता अभियान, मनुष्यबळ विकास व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांसाठी राबवण्यात आलेले विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कामगार संघटना व मनुष्यबळ विकास अधिकारी यांच्यातील संयुक्तिक चर्चासत्रे , मनुष्यबळ विकास क्षेत्रातील बेस्ट प्रॅक्टिसेस या विषयावरील कार्यशाळा तसेच युवा शक्ती फाउंडेशन व आयामाच्या सहकार्याने मुख्यमंत्री युवा कौशल विकास कार्यशाळा आदी विषयांवर झालेल्या चर्चासत्रांची त्यांनी माहिती दिली. मावळत्या कार्यकारिणीचा आर्थिक अहवाल समितीचे खजिनदार विनायक पाटील यांनी सादर केला. यावेळी चर्चेत मुख्यत्वे निपम चे माजी अध्यक्ष डॉ  अशोक सोनवणे, डॉ श्रीधर व्यवहारे, दिलीप महाले, व्ही बी डांगरे आदींनी सहभाग घेतला व महासभा खेळीमेळीच्या च्या वातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना डॉक्टर उदय खरोटे म्हणाले मावळते अध्यक्ष प्रकाश बारी व हेमंत राख यांच्या कार्यकारणी अनेक स्तुत्य उपक्रम राबवले त्यांचे उपस्थित त्यांनी टाळ्यांच्या कडकडात अभिनंदन करावे असे सुचित केले, पुढे ते म्हणाले की निपमच्या नवीन कार्यकारणीस आपला सर्वतोपरी पाठिंबा राहील पण नूतन कार्यकारिणीने नाशिकच्या विकासासाठी आगळे वेगळे उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटावा तसेचन निपमचे कार्यालय साठी नवीन वास्तूची निर्मिती करावी व या वास्तूत सभागृहासह  अद्यावत अशा सुविधांची निर्मिती करावी तसेच नवनवीन चर्चासत्रे व मनुष्यबळ विकासासाठी चे उपक्रम राबविण्यात यावे असे ते म्हणाले. या कार्यक्रमात नाशिकच्या निपम शाखेचे माजी अध्यक्ष चौबळ , एडवोकेट एस एस खैरनार, जे  के शिंदे ,डॉक्टर अशोक सोनवणे, डॉक्टर श्रीधर व्यवहारे, विश्वनाथ डांगरे, सुधीर पाटील, डी एन महाले, अशोक घुले, उदय खरोटे, सुधीर पाटील,  यांचे सह  उपस्थित माजी अध्यक्षांचा आवर्जून सत्कार करण्यात आला. तसेच महिला प्रतिनिधी म्हणून यादवी पवार व हर्षदा सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र आचारी व प्रकाश गुंजाळ यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश गुंजाळ यांनी केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुस्मित  दळवी आभार प्रदर्शन राजेंद्र आचारी यांनी केले यांनी केले  या सर्वसाधारण सभेस अजित कांकरिया, दीपक मालेवार, भास्कर मोरे, सुधीर देशमुख, वैभव कुलकर्णी, उमानाथ सिंग, संजय पाठक, सुनील पाथरकर, कुणाल कुलकर्णी, राजेंद्र लोळगे, अर्शद शेख, किशोर नेहते,अनिल सहजे, दीपक पवार, सुनील वाघ, कल्पेश कालोरे , विशाल घावटे, कैलास शिरसाठ,  १००हून  अधिक नीपम चे  सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला