वडीलांच्या वर्ष श्राद्धच्या निमित्ताने वृक्षरोप वाटप
नाशिक :- पृथ्वीच्या तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे.त्यामुळे धरतीमाता मानवाकडे वृक्ष लागवडीची साद घालत आहे. मातेला स्वतःची चिंता नाही पण चिंता आहे ती भूमीवर असणाऱ्या तिच्या लेकरांची म्हणजेच मानवा बरोबर लाखो पशू पक्षी जिवजंतू यांची यासर्वांच्या भविष्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे हा एकमेव पर्याय समोर राहिला आहे.याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.
मातेच्या रक्षणासाठी काही देणे लागतो याचाच विचार करत म्हसरूळ येथील भावसार परिवाराने आपले वडील कैलासवासी देविदास जयरामशेठ भावसार यांच्या वर्ष श्राध्द दिनाच्या निमित्ताने वडिलांची आठवण तसेच आशीर्वाद झाडांच्या रूपाने कायम स्वरूपी राहावे यासाठी एक आगळा वेगळा उपक्रम राबवत सर्व नातेवाईक,व आलेल्या पाहुण्यांना आंबा या झाडाची रोप देण्यात आले. यावेळी मुलगा पराग,प्रशांत,अमोल व मुलगी जयश्री यांनी केलेल्या या उपक्रमांचे परिसरात कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment