मखमलाबाद विद्यालयात आद्य शंकराचार्य न्यासातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मखमलाबाद विद्यालयात आद्य शंकराचार्य न्यासातर्फे संस्कृत विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी विश्वस्त अॅड.मनिष चिंधडे,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्य राजेंद्र गाडे,जेष्ठ शिक्षकवृंद
मखमलाबाद :- मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे आद्य शंकराचार्य यांचे स्मरणार्थ संस्कृत विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन आद्य शंकराचार्य न्यासाचे विश्वस्त अॅड.मनिष चिंधडे, हे उपस्थित होते.मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वतीपुजन करण्यात आले.संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या शालेय गीतमंचातर्फे सुरेल आवाजात स्वागतगीत सादर करण्यात आले.प्राचार्य संजय डेर्ले, यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी व्यासपिठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे,जेष्ठ शिक्षक संतोष उशीर,माता पालक संघाच्या सदस्य योगिता शिंदे, आदी उपस्थित होते.प्रास्ताविक जेष्ठ संस्कृत शिक्षिका योगिता कापडणीस, यांनी केले.त्यांनी या गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे उद्दीष्ट साध्य केले.विश्वस्त अॅड.मनिष चिंधडे, यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,भारतात संस्कृत भाषेला फार महत्व आहेत.संस्कृत ही प्राचीन भाषा असुन या भाषेचा अभ्यास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी करावा.त्यांना अभ्यासासाठी स्फुर्ती मिळावी व संस्कृत भाषेची योग्य प्रकारे जपवणूक व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना ही बक्षिसे देण्यात आलेली आहेत असेही त्यांनी शेवटी सांगितले.आद्य शंकराचार्य न्यास,नाशिक यांचेतर्फे इ.८ वी ते १० वी संस्कृत विषयात वार्षिक परीक्षेतील प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक मिळविणार्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे १०००/-रु.,७५०/-रु.,५००/- रु.चे अशाप्रकारे एकुण ९२ विद्यार्थ्यांना ७४,०००/- रु.ची बक्षिसे प्रदान करण्यात आली.या सर्व विद्यार्थ्यांना जेष्ठ संस्कृत शिक्षिका योगिता कापडणीस व अश्विनी वडघुले, यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.सुत्रसंचालन जेष्ठ शिक्षिका वैशाली देवरे, यांनी केले.आभार प्रदर्शन संस्कृत शिक्षिका अश्विनी वडघुले यांनी केले.कार्यक्रमास सर्व गुणवंत विद्यार्थी,त्यांचे पालक, शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment